महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

अक्षय कुमारचा 'मिशन राणीगंज' ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रसारित - अक्षय कुमारचा मिशन राणीगंज चित्रपट

Mission Raniganj OTT Release: अभिनेता अक्षय कुमार स्टारर 'मिशन राणीगंज' हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रसारित झाला आहे. या चित्रपटामध्ये खिलाडी कुमारनं दिवंगत जयवंत सिंग गिल यांची भूमिका साकारली आहे.

Mission Raniganj OTT Release
मिशन राणीगंज ओटीटीवर रिलीज

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 2, 2023, 1:03 PM IST

मुंबई - Mission Raniganj OTT Release:अभिनेता अक्षय कुमार आणि परिणीती चोप्रा यांचा 'मिशन राणीगंज' चित्रपट 6 ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली आहे. 'मिशन राणीगंज'नं बॉक्स ऑफिसवरही चांगलं कलेक्शन केलंय. दरम्यान आता या चित्रपटाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. अक्षय कुमारचा 'मिशन राणीगंज' चित्रपटगृहांमध्ये रिलीज झाल्यानंतर, आता ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रसारित झाला आहे. अक्षय कुमार आणि नेटफ्लिक्सनं इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करून याबद्दलची माहिती दिली आहे.

'मिशन रानीगंज' चित्रपट नेटफ्लिक्सवर :अक्षयनं शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो एक छोटीशी कथा सांगताना दिसत आहे. यानंतर तो चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रसारित झाला आहे याबद्दल सांगत आहे. 'मिशन राणीगंज' हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. 1989 मध्ये कोळसा खाण कामगारांना वाचवण्यासाठी दिवंगत जयवंत सिंग गिल यांच्या धाडसी मोहिमेचे चित्रण या चित्रपटात करण्यात आले आहे. पश्चिम बंगालमधील राणीगंज येथे कोळसा खाणीत 65 मजूर अडकले होते. त्याचवेळी अभियंता जसवंत सिंग गिल यांनी आपला जीव धोक्यात घालून या 65 मजुरांचे प्राण वाचवले होते. या चित्रपटात अक्षय कुमारनं जयवंत सिंग गिलची भूमिका साकारली आहे.

'मिशन रानीगंज' चित्रपटाबद्दल : या चित्रपटमध्ये अक्षय कुमार व्यतिरिक्त रवि किशन, कुमुद मिश्रा,राजेश शर्मा, सुनील शेट्टी, अनंत महादेवन आणि इतर कलाकार आहेत. 'मिशन राणीगंज'ची कहाणी प्रेक्षकांना खूप आवडली असून राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त हा चित्रपट प्रेक्षकांची पहिली पसंती ठरला होता. 'मिशन राणीगंज'ची निर्मिती वाशू भगनानी, जॅकी भगनानी, दीपशिखा देशमुख आणि अजय कपूर यांनी केली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन टिनू सुरेश देसाई यांनी केलंय. या चित्रपटाचे कौतुक समीक्षकांनीही केलं आहे. दरम्यान अक्षय कुमारच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो 'सिंघम 3', 'स्काई फोर्स' आणि 'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटांमध्ये दिसणार आहेत.

हेही वाचा :

  1. प्रभासच्या सालारचा ट्रेलर रिलीज, उत्कंठा वाढवणाऱ्या दृष्यांनी चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
  2. 'आजचा दिवस 'सालार'चा' म्हणत प्रभास फॅन्सचा निर्मात्यांनी वाढवला उत्साह
  3. 'भाजपाकडून निवडणूक लढवणार' बातमीचं कंगना रणौतनं केलं खंडन

ABOUT THE AUTHOR

...view details