मुंबई - OMG 2 : बॉलीवूड स्टारर अक्षय कुमार 'ओएमजी 2'चे पोस्टर आणि ट्रेलर रिलीज झाल्यानंतर हा चित्रपट वादात सापडला होता. या चित्रपटाला सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) कडून काही दिवसानंतर मंजुरी मिळाली. हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित रुपेरी पडद्यावर रिलीज झाला. दरम्यान आता या चित्रपटाबाबत आणखी एक वाद निर्माण झाला आहे. हिंदू संघटनांनी महादेवाच्या संदेशवाहकाची भूमिका साकारल्याबद्दल अक्षय कुमारवर टीका केली आहे. आता अक्षयनं यावर स्पष्टीकरण देखील दिले आहे. एका मुलाखतीत त्यानं सांगितलं की, 'मी हा चित्रपट लहान मुलांसाठी बनवला आहे. मला 'ओएमजी 2' चित्रपट मुलांना दाखवायचा होता. 'परंतु, दुर्दैवानं, प्रौढ सामग्री नसतानाही याला 'ए' प्रमाणपत्र देण्यात आलं, त्यामुळे लहान मुलांना हा चित्रपट दाखवता आला नाही. पुढं त्यानं सांगितलं की, 'थिएटरमध्ये जे कट होते तेच कट ओटीटीवर आहेत. मी सेन्सॉर बोर्डाचा आदर करतो. मी सेन्सॉर बोर्डाकडून मंजूर घेतली आहे'.
अक्षय कुमारची मुलाखत :अक्षयनं पुढं सांगितलं की, 'राऊडी राठौर', 'सूर्यवंशी' किंवा 'सिंग इज किंग' यासारखे चित्रपट केलं तर, कमाई तीन ते चार पटीनं वाढेल याची मला जाणीव आहे'. अक्षयनं तरीही, समाजात निषिद्ध बनलेल्या थीमवर चित्रपट बनवला. या सिनेमांमधून तो जास्त कमाई करणार नाही हे त्याला आधीच माहित होतं. त्यानं हा चित्रपट कमाई करण्यासाठी नाही तर, समाजात जागृतता निर्माण करण्यासाठी केला. अमित राय दिग्दर्शित या चित्रपटामध्ये पंकज त्रिपाठी आणि यामी गौतम यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.