मुंबई Akshay Kumar Birthday : बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा आज 56वा वाढदिवस आहे. अक्षय कुमारचा जन्म ९ सप्टेंबर १९६७ रोजी झाला. अक्षयचं खरं नाव राजीव भाटिया आहे. चित्रपटसृष्टीत आल्यानंतर त्यानं त्याचं नाव बदललं. अक्षयच्या वडिलांचं नाव हरी ओम भाटिया आहे. अक्षय कुमार हा मार्शल आर्टमध्ये पारंगत आहे. अक्षय कुमारनं 1991 मध्ये 'सौगंध' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर अक्षयनं आपल्या मेहनतीच्या जोरावर चित्रपटसृष्टीत नाव कमावलं. अक्षय कुमारनं अनेक चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. आज अक्षयची फॅन फॉलोइंग खूप मोठी आहे. दरम्यान आता अक्षयच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या काही खास चित्रपटाबद्दल बोलूया....
- फिर हेरा फेरी :अक्षय कुमारचा 2006 मध्ये रिलीज झालेला 'फिर हेरा फेरी' हा एक उत्कृष्ट विनोदी चित्रपट होता. यामध्ये बाबुराव, राजू आणि श्याम या त्रिकुटाला लोकांनी खूप पसंत केलं होतं. हा चित्रपट 2000 मध्ये रिलीज झालेल्या 'हेरा फेरी'चा सीक्वल आहे. या चित्रपटात सर्व पात्रांनी प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं होतं. यात अक्षय कुमारसह सुनील शेट्टी आणि परेश रावल मुख्य भूमिकेत होते.
- बेबी : हा चित्रपट २०१५ मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी खूप पसंत केलं होतं. या अॅक्शन-थ्रिलर चित्रपटामध्ये, अक्षय कुमार दहशतवादी हल्ला हाणून पाडण्यासाठी काउंटर इंटेलिजन्स टीमचं नेतृत्व करतो. अक्षयच्या चित्रपटामधील अॅक्शन सीन्समुळे 'बेबी' त्याच्या कारकिर्दीतील एक उत्कृष्ट चित्रपट बनला आहे.
- गरम मसाला : हा चित्रपट 2005 साली रिलीज झालेला कॉमेडी चित्रपट होता. या चित्रपटात अक्षय कुमारनं फोटोग्राफरची भूमिका साकारली होती. अक्षय कुमारसोबत या चित्रपटात जॉन अब्राहम, परेश रावल आणि रिमी सेन सारखे कलाकार होते. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.
- भूल भुलैया :हा चित्रपट 2007 मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटानं लोकांना फक्त घाबरवलं नाही तर त्यांना खूप हसवलं. या चित्रपटात अक्षय कुमारनं आदित्य नावाच्या सायकॅट्रीस्टची भूमिका साकारली होती. 'भूल भुलैया' चित्रपटातील प्रत्येक पात्र प्रेक्षकांना खूप आवडलं होतं. विशेषतः विद्या बालननं साकारलेली मंजुलिका ही व्यक्तिरेखा खूप जबरदस्त होती. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.
- केसरी : हा चित्रपट 2019 मध्ये रिलीज झालेला अॅक्शन-वॉर चित्रपट आहे. यामध्ये अक्षय कुमारनं हवालदार इशर सिंग या ब्रिटिश भारतीय सैन्यातील सैनिकाची भूमिका केली आहे, जो शीख सैनिकांचे नेतृत्व करतो. या चित्रपटामध्ये तो शेवटच्या श्वासापर्यंत आक्रमकांचा सामना करतो. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.