महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Akshay Kumar shooting in London : अक्षय कुमारनं लंडनमध्ये सुरू केलं 'खेल खेल में'चं शुटिंग - shooting for Khel Khel Mein

अक्षय कुमारनं 'खेल खेल में' या चित्रपटाचं लंडनमध्ये शुटिंग सुरू केलं आहे. मुदस्सर अझिज दिग्दर्शन करत असलेल्या या चित्रपटाचं जगातील स्कॉटलंड, लंडन, भारतत आणि सौदे अरेबियातील भव्य आणि सुंदर लोकेशन्सवर पार पडणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार शिवाय तापसी पन्नू, वाणी कपूर, आदित्य सेयल आणि एम्मी विर्क या कलाकारांच्या यात प्रमुख भूमिका असतील.

Akshay Kumar shooting in London
क्षय कुमारचं 'खेल खेल में'चं शुटिंग

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 21, 2023, 3:53 PM IST

लंडन - अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असलेल्या 'खेल खेल में' या चित्रपटाचं शनिवारी लंडनमध्ये शुटिंग सुरू झालं. अक्षयनं आपल्या इन्स्टाग्रामवर ही अपडेट आपल्या चाहत्यांना कळवली आहे. अक्षयचा कूल लूक असलेला एक व्हिडिओ त्यानं इन्स्टावर शेअर केलाय. या व्हिडिओत डोळ्यावर चष्मा घालून स्मितहास्य द्यायला अक्षय कुमार विसरलेला दिसत नाही. अक्षयनं ही अपडेट देताच त्याच्या चाहत्यांनी व फॉलोअर्सनी कमेंट सेक्शनमध्ये त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

'कॅमेरा रोल झाल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर आपोआप स्मित हास्य दिसू लागतं', असं एका चाहत्यानं म्हटलंय. 'ऑल द बेस्ट अक्षय कुमार', असं एका युजरनं लिहिलंय. 'अक्षय कुमार सरांचे २०२४ मध्ये सर्व चित्रपट धमाल करणार आहेत. यासाठी बेस्ट लक', असं दुसऱ्यानं लिहिलंय. 'खेल खेल में' या चित्रपटाचं दिग्दर्शन मुदस्सर अझिज करत असून तापसी पन्नू, वाणी कपूर, आदित्य सेयल आणि एम्मी विर्क या कलाकारांच्या यात प्रमुख भूमिका असतील. या चित्रपटाच्या तपशीलाची अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

येणाऱ्या महिन्यामध्ये अक्षय कुमार 'छोटे मियाँ बडे मियाँ' या चित्रपटात टायगर श्रॉफसोबत काम करणार आहे. 2024 च्या ईदला हा चित्रपट रिलीज होणार आहे. अब्बास जफर दिग्दर्शन करत असलेल्या या चित्रपटाचं शुटिंग स्कॉटलंड, लंडन, भारतत आणि सौदे अरेबियातील भव्य आणि सुंदर लोकेशन्सवर पार पडणार आहे. या रिलीजसाठी उत्साही असलेल्या अब्बास यांनी सांगितलं की, 'अशा मोठ्या फ्रँचाइजचा मी एक भाग असल्यानं मी स्वतःला धन्य समजतो. 'छोटे मियाँ बडे मियाँ' हा चित्रपट प्रेक्षकांच्या हृदयाच्या खूप जवळचा असेल. या मास एन्टरटेनर चित्रपटात सर्व प्रकारचं मनोरंजन पाहायला मिळेल. प्रेक्षकांसाठी हा एक खास अनुभव देणारं मनोरंजन असेल. यातील सर्वोच्च आनंदाची गोष्ट म्हणजे या चित्रपटाचं रिलीज 2024 च्या ईदला होणार आहे. प्रेक्षकांच्यासाठी सणाच्या दरम्यानचे हे एक पॉवर पॅक्ड मनोरंजन असणार आहे.'

अक्षय कुमारच्या हातातही 'वेलकम ३', 'सिंघम अगेन' आणि 'हाऊसफुल्ल ५' हे मोठे चित्रपट आहेत. तो अलिकडेचमिशन 'राणीगंज : ग्रेट भारत रेस्क्यू' या चित्रपटात दिसला होता. यामध्ये त्यानं जसवंत सिंग गिल या कोळशाच्या खाणीमध्ये काम करणाऱ्या इंजिनियरची भूमिका साकारली होती. १९८९ मध्ये राणीगंज कोळसा खाणीमध्ये गेलेले ६४ कामगार अडकले होते. त्यांना वाचवण्याचे सर्व मार्ग बंद झाले होते. अनेक अधिकाऱ्यांनी आपली असमर्थता व्यक्त केली होती व हे सर्व कामगारांचा आतापर्यंत मृत्यू झाला असेल असा अंदाज बांधला होता. मात्र त्यावेळी जसवंत सिंग गिल यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून खाणीमध्ये प्रवेश केला आणि सर्व कामगारांना सुखरूप वाचवलं. विशेष म्हणजे खाणीतून सर्वात शेवटी बाहेर येणारे ते स्वतःच होते. या खऱ्या रियल हिरोची कथा या चित्रपटातून अक्षय कुमारनं साकारली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details