महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

OMG 2 Trailer Released :आरोपी आणि फिर्यादी एकच, कोर्टात रंगणार अजब खटला, पाहा OMG 2 ट्रेलर - आरोपी आणि फिर्यादी एकच

'ओ माय गॉड २' चित्रपटाचे ट्रेलर अखेर आज रिलीज झाला. उत्तम संवाद, मनाला खिळवून ठेवणारे कथानक, अक्षय कुमार आणि पंक्ज त्रिपाठींचा स्क्रिन प्रेझेन्स चित्रपटाबद्दलचा उत्साह वाढवणारा आहे.

Akshay kumar
अक्षय कुमार

By

Published : Aug 3, 2023, 1:15 PM IST

Updated : Aug 3, 2023, 1:22 PM IST

मुंबई : 'ओ माय गॉड २' हा चित्रपट देव आणि भक्त वर आधारित असून या चित्रपटामध्ये अक्षय कुमार जबरदस्त अंदाजात दिसणार आहे. हा चित्रपट वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. २०१२ मध्ये हिट चित्रपट 'ओ माय गॉड 'चा 'ओ माय गॉड २' सीक्वेल आहे. तब्बल ११ वर्षांनंतर या चित्रपटाचा सीक्वेल मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. दरम्यान आज या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरला प्रेक्षक खूप पसंत करत आहेत. चित्रपटाचा ट्रेलर हा काल २ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार होता मात्र. नितीन देसाईच्या निधनामुळे 'ओ माय गॉड २'च्या ट्रेलर रिलीजची तारीख पुढे ढकलण्यात आली होती, त्यामुळे हा ट्रेलर आज रिलीज झाला.

'ओह माय गॉड २'वर सेन्सॉर बोर्डाने केली होती करवाई : आदिपुरुष या चित्रपटाच्या वादानंतर सेन्सॉर बोर्डने 'ओह माय गॉड २'वर कात्री चालविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र सेन्सॉर बोर्डाने कोणतीही कपात न करता प्रमाणित केल्यानंतर 'ओह माय गॉड २'च्या निर्मात्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. त्यानंतर चित्रपटाला बदलांसह प्रदर्शित करण्यास मान्यता देण्यात आली . 'ओह माय गॉड २'ला 'ए' प्रमाणपत्रही देण्यात आले आहे. ही बातमी आल्यापासून अक्षय कुमारचे सर्व चाहते जल्लोषात आहेत. अक्षय कुमारने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर एका पोस्टद्वारे चाहत्यांना ट्रेलरच्या रिलीजची तारीख सांगितली होती, मात्र त्यानंतर एका ट्विटद्वारे चित्रपटाच्या ट्रेलर रिलीज ३ तारीख करण्यात येईल असे त्याने सांगितले होते.

'ओह माय गॉड २' ट्रेलर :'ओह माय गॉड २'चा ट्रेलर हा चाहत्यांना खूप आवडला आहे. ट्रेलर पोस्टवर आधीच चाहते या चित्रपटाला ब्लॉकबस्टर म्हणत आहेत. याशिवाय अक्षय अनेक चाहते त्याची प्रशंसा करत आहेत. ट्रेलरमध्ये सर्वात आधी महादेव सांगताना दिसतात की, माझ्या भक्तावर संकट येणार आहे. तर माझ्या शिवगणमधून अशा कोणाला घेवून जा जे माझ्या भक्ताची रक्षा करेल. त्यानंतर ट्रेलरमध्ये एका कुटुंबावर एक संकट येत. या संकटातून वाचण्यासाठी हे कुटुंब प्रयत्न करताना दिसतात. ट्रेलरमध्ये पंकज त्रिपाठी आणि यामी गौतमी कर्टामध्ये केस लढताना दिसत आहे. हा ट्रेलर अतिशय भारी आहे. हा चित्रपट ११ ऑगस्ट रोजी रूपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. यासोबतच 'गदर २' चित्रपट देखील याच दिवशी रिलीज होणार आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर या चित्रपटांमध्ये चांगलीच लढत होणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमारसोबत यामी गौतम पंकज त्रिपाठी, परेश रावल मुख्य भूमिकेत आहेत.

Last Updated : Aug 3, 2023, 1:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details