महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

अक्षय कुमार आणि ज्युनियर एनटीआरनं आगामी चित्रपटांचे पोस्टर केले शेअर - आगामी चित्रपट

Celebs wish fans New Year: नवीन वर्ष सुरू झाले आहे. या खास प्रसंगी, चित्रपटसृष्टीतील बड्या स्टार्सनी त्यांच्या आगामी चित्रपटाच्या झलकसह त्यांच्या चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अक्षय कुमार आणि ज्युनियर एनटीआर यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहेत.

Celebs wish fans New Year
सेलेब्सनं चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 1, 2024, 4:50 PM IST

मुंबई - Celebs wish fans new year: 2023ला बाय बाय केल्यानंतर संपूर्ण जगानं नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत केले आहे. दरम्यान भारतीय चित्रपटसृष्टीतही या खास प्रसंगी, बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि साऊथ सुपरस्टार ज्युनियर एनटीआर यांनी त्यांच्या चाहत्यांना भेट दिली आहे. नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत अक्षय कुमारनं त्याच्या आगामी 'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटाचं मुख्य गाणं पोस्टरसह शेअर केले आहे. इंस्टाग्रामवर पोस्टर शेअर करताना खिलाडी कुमारनं लिहिलं , ''तुमचे नवीन वर्ष आनंदाने भरलेले जावो. 'बडे मियाँ छोटे मियाँ' कडून नवीन वर्षाच्या शुभेच्छा. आम्हाला थिएटरमध्ये भेटण्यासाठी ईद 2024 ब्लॉक करायला विसरू नका''.

अक्षय कुमारनं शेअर केली पोस्ट :अक्षय कुमारनं ही पोस्ट शेअर केलेल्यानंतर अनेकजण यावर कमेंट्स करत आहे. एका चाहत्यानं या पोस्टवर कमेंट करत लिहिलं, ''बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटाची मी प्रतीक्षा करत आहे''. दुसऱ्या एका चाहत्यानं लिहिलं, ''अक्षय सर मी तुमचा मोठा चाहता आहे, हा चित्रपट मी नक्की पाहणार''. आणखी एकानं लिहिलं, ''अक्षय सर 'बडे मियाँ छोटे मियाँ' चित्रपटाचं गाणं खूप सुंदर आहे''. अशा अनेक कमेंट या पोस्टवर येत आहेत. याशिवाय काहीजण या पोस्टवर हार्ट आणि फायर इमोजी शेअर करत आहेत. या चित्रपटाची वाट अनेकजण पाहताना सध्या दिसत आहे. या चित्रपटामध्ये अक्षय आणि अभिनेता टाइगर श्रॉफ अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसणार आहेत.

'देवरा'चं नवीन पोस्टर : दरम्यान, आरआरआर स्टार ज्युनियर एनटीआरनं त्याच्या आगामी 'देवरा' चित्रपटाच्या झलकसह नवीन वर्षाची सुरुवात केली आहे. त्यानं 1 जानेवारी रोजी त्याच्या आगामी 'देवरा' या चित्रपटाचे नवीन पोस्टर रिलीज केले आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्यानं लिहिलं ''तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. 8 जानेवारी रोजी तुम्हा सर्वांसाठी 'देवरा''. या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये एनटीआर समुद्राच्या जोरदार प्रवाहात बोटीवर स्वार होताना दिसत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबतच जान्हवी कपूर, सैफ अली खान देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

हेही वाचा :

  1. 'डंकी'नं रिलीजच्या बाराव्या दिवशी केली धमाकेदार कमाई
  2. रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी लवकरच लग्नबंधनात अडकणार
  3. रिलीजच्या दहाव्या दिवशीही 'सालार'ची बॉक्स ऑफिसवर चलती, केली 'इतकी' कमाई

ABOUT THE AUTHOR

...view details