मुंबई- दिग्दर्शक राज मेहता यांनी अक्षय कुमार आणि इमरान हाश्मी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या त्यांच्या आगामी सेल्फी चित्रपटाच्या पहिल्या शेड्यूलचे शुटिंग पूर्ण केले आहे. नुशरत भरुच्चा आणि डायना पेंटी यांच्याही भूमिका असलेल्या या कॉमेडी-ड्रामा चित्रपटाचे शुटिंग या वर्षी मार्चमध्ये सुरू झाले होते.
सेल्फी हा २०१९ मल्याळम-भाषेतील कॉमेडी-ड्रामा ''ड्रायव्हिंग लायसन्स''चा रिमेक आहे. मूळ मल्याळम चित्रपटामध्ये पृथ्वीराज सुकुमारन आणि सूरज वेंजारामूडू यांनी भूमिका केल्या होत्या. इन्स्टाग्रामवर दिग्दर्शक राज मेहता यांनी कलाकार आणि क्रूसह एक फोटो पोस्ट केला आहे. त्यांनी भोपाळमध्ये कोणत्याही मोठ्या अडथळ्याशिवाय कठीण शुटिंग शेड्यूल पूर्ण केल्याबद्दल टीमचे आभार मानले आहेत.
"काय शेड्यूल आहे! चित्रपटाचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे! कोणत्याही मोठ्या अडथळ्याशिवाय हे अत्यंत कठीण वेळापत्रक पूर्ण करणारी एक टीम आहे हे खरोखरच धन्य आहे!'', असे म्हणत मेहता यांनी संपूर्ण टीमचे आभार मानले आहेत.
मूळ मल्याळम चित्रपटाचे दिग्दर्शन लाल ज्युनियर यांनी साची यांच्या स्क्रिप्टवरून केले होते. या चित्रपटाचे कथानक एका ड्रायव्हिंग लायसन हरवलेल्या सुपरस्टार (सुकुमारन) भोवती फिरते जो त्याच्या ड्रायव्हिंग कौशल्यासाठी प्रसिद्ध आहे. परंतु त्याचा फॅन असलेला मोटर इन्स्पेक्टरशी (वेंजारमूडू) त्याची भेट होते आणि परिस्थिती अवाक्याच्या बाहेर जाते. सेल्फीची निर्मिती धर्मा प्रॉडक्शन आणि कुमार केप ऑफ गुड फिल्म्स सोबत सुकुमारनचे पृथ्वीराज प्रॉडक्शन आणि मॅजिक फ्रेम्स यांनी केली आहे.
हेही वाचा -अजय देवगणने मुलगी न्यासाच्या बॉलिवूड एन्ट्रीबद्दल केला खुलासा