मुंबई - अक्षय कुमारचा 'सम्राट पृथ्वीराज' चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही. अक्षय कुमारच्या 'राम सेतू' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. आता अक्षयच्या 'राम सेतू' चित्रपटाची दिवाळीला अजय देवगणच्या 'थँक गॉड'सोबत टक्कर होणार आहे. यामुळे बॉलिवूडमध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळत आहे. अक्षय कुमार स्टारर 'राम सेतू' आणि अजय देवगण स्टारर 'थँक गॉड' दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज होऊ शकतात.
कोविड-19 मुळे अनेक चित्रपट रिलीजच्या प्रतीक्षेत लटकले आहेत. अशा परिस्थितीत चित्रपट निर्माते त्यांचे चित्रपट लवकरात लवकर प्रदर्शित करण्यात व्यस्त आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 'राम सेतू' आणि 'थँक गॉड' दिवाळीला रिलीज होणार आहेत. अक्षय कुमारने पोस्टर शेअर करत सांगितले की हा चित्रपट 2022 मध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सत्यदेव आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्याशिवाय नुसरत भरुचा देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार पुरातत्वशास्त्रज्ञाच्या भूमिकेत दिसणार आहे.