महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

अजय देवगणचा साहसी, गुढ आणि आक्रमक 'भोला' चित्रपटाचा टीझर रिलीज - Ajay Devgan upcoming movie Bhola

अजय देवगण दिग्दर्शित आगामी भोला या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. यात अजय देवगण अत्यंत साहसी, गुढ आणि आक्रमक दिसत आहे. भोला हा चित्रपट 2019 च्या तमिळ-भाषेतील लोकेश कनागराजचा हिट चित्रपट 'कैथी' (कैदी) चा रिमेक आहे, या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्माताही अजय देवगण आहे. हा चित्रपट पोस्ट प्रोडक्शनमध्ये आहे आणि मार्च 2023 मध्ये रिलीज होणार आहे.

'भोला' चित्रपटाचा टीझर रिलीज
'भोला' चित्रपटाचा टीझर रिलीज

By

Published : Nov 22, 2022, 12:52 PM IST

मुंबई- अजय देवगण सध्या 'दृष्यम २' चे यश अनुभवत आहे. भारतासह जगभर या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद प्रेक्षक देत आहेत. अशातच त्याच्या आगामी भोला या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. यात अजय देवगण अत्यंत साहसी, गुढ आणि आक्रमक दिसत आहे.

टीझरची सुरुवात एका अनाथ आश्रमापासून होते. यात एका अनाथ मुलीला सांगितले जाते की तू सकाळी लवकर उठ, तुला भेटायला कोणीतरी येणार आहे. ही मुलगी आपली इतर सहकारी बालमैत्रीणींना विचारते की नातेवाईक कोण कोण असतात? तर थोडक्यात ही अनाथ मुलीच्या आयुष्यता तिच्या जवळचे कोणी तरी भेटायला येणार आहे.

दुसरीकडे एक कैदी भगवद्गगीता वाचताना दिसतो. त्याची सुटका झाली आहे आणि आता तो जेलबाहेर पडणार आहे. हा अद्भूत कैदी भोला आहे. तो कैदी का झाला इथंपासून ते अनाथ मुलीच्या आयुष्यात येणाऱ्या व्यक्तीचा कथापट भोलामध्ये पाहायला मिळणार आहे.

भोला हा चित्रपट 2019 च्या तमिळ-भाषेतील लोकेश कनागराजचा हिट चित्रपट 'कैथी' (कैदी) चा रिमेक आहे, या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्माताही अजय देवगण आहे. हा चित्रपट पोस्ट प्रोडक्शनमध्ये आहे आणि मार्च 2023 मध्ये रिलीज होणार आहे.

भोला हा चित्रपट थ्रीडीमध्येही बनत असून भोलाच्या रुपाने अजय देवगण पुन्हा एकदा एक लार्जर दॅन लाईफ एंटरटेनर चित्रपटाची निर्मिती करत आहे. या चित्रपटात अजय देवगणसह अभिनेत्री तब्बू आणि अमला पॉल अभिनय करत आहे.

हेही वाचा -कार्तिक आर्यन 32 वा वाढदिवस : 'मोनोलॉग किंग' कार्तिक बनला "किंग ऑफ द सिक्वेल"

ABOUT THE AUTHOR

...view details