महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Ajay Devgn : अजय देवगण आर माधवनच्या हॉरर थ्रिलर चित्रपटाची रिलीज डेट झाली फायनल - R Madhavan

Ajay Devgn : अजय देवगण आर माधवन आणि ज्योतिका स्टारर आगामी हॉरर थ्रिलर चित्रपट मार्च 2024 मध्ये मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट विकास बहल दिग्दर्शित असून अद्यापही या चित्रपटाचं शीर्षक समोर आलेलं नाही.

Ajay Devgn
अजय देवग

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 7, 2023, 5:34 PM IST

मुंबई Ajay Devgn : बॉलीवूड अभिनेता अजय देवगणने काही दिवसापूर्वी त्याच्या आगामीच्या चित्रपटाची घोषणा केली होती. ज्यानंतर या चित्रपटाबाबत चाहते खूप उत्सुक होते. विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये तो पहिल्यांदाच आर माधवनसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. या चित्रपटामध्ये साऊथ अभिनेत्री ज्योतिका देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा हॉरर थ्रिलर चित्रपट असणार आहे. दरम्यान आता या चित्रपटाबाबत अपडेट समोर येत आहे. आता अजय देवगणनं या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. अजय देवगण, ज्योती देशपांडे, कुमार मंगत पाठक आणि अभिषेक पाठक यांनी या चित्रपटाची निर्मित केली आहे.

ब्लॅक मॅजिकची चर्चा :आधी अजयच्या आगामी चित्रपटाचं नाव 'ब्लॅक मॅजिक' असल्याची चर्चा होती. मात्र, या चित्रपटाचं नाव अद्याप निश्चित झालेलं नाही. या चित्रपटाचं दिग्दर्शन विकास बहल यांनी केलं आहे. यापूर्वी 'सुपर 30', 'क्वीन आणि 'गुडबाय' सारख्या चित्रपटांसाठी त्यांनी काम केलं आहे. या चित्रपटाद्वारे ज्योतिका ही 25 वर्षांच्या विश्रांतीनंतर हिंदी चित्रपटसृष्टीत परत येत आहे. तिचा शेवटचा हिंदी चित्रपट 1997 मध्ये प्रियदर्शन दिग्दर्शित 'डोली सजा के रखना' हा होता. या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. 'डोली सजा के रखना'मध्ये तिच्यासोबत अक्षय खन्ना मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटामधील गाणं प्रचंड हिट झालं होतं.

पोस्ट केली शेअर :रिलीजची तारीख जाहीर करताना, अजय देवगणच्या प्रॉडक्शन कंपनीच्या एक्स हँडलवरच्या पोस्टमध्ये असं लिहिलं आहे की, 'अलौकिक रोलरकोस्टर राईडसाठी तयार व्हा! विकास बहलच्या दिग्दर्शनाखाली अजय देवगण, आर माधवन आणि ज्योतिका या शक्तिशाली त्रिकुटासाठी सज्ज व्हा.' शेअर केलेल्या या पोस्टवर अनेकजणांच्या कमेंट येत आहेत. अजयच्या चाहत्यांनी या चित्रपटाला रिलीज होण्यापूर्वीच हिट म्हटलं आहे. यासोबत या चित्रपटासाठी त्याला शुभेच्छा दिल्या आहे. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर 8 मार्च 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा :

  1. Shah Rukh Khan Jawan Movie : 'जवान' चित्रपटाद्वारे शाहरुख खाननं जिंकली चाहत्यांची मनं...
  2. Jawan Day १ Box Office : शाहरुख खानचा 'जवान' चित्रपट चाहत्यांवर करत आहे जादू...
  3. Jawan Box Office Collection : पहिल्याच दिवशी शाहरुख खान स्टारर 'जवान' चित्रपट घेणार मोठी झेप...

ABOUT THE AUTHOR

...view details