मुंबई - बॉलिवूड अभिनेता-दिग्दर्शक अजय देवगण त्याचा नवीन 'रनवे 34' या चित्रपटाच्या रिलीजसाठी तयारी करत आहे. या चित्रपटाचा दिग्दर्शक आणि निर्माता देखील असलेला अभिनेता अजय देवगण रनवे 34 च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. चित्रपटाच्या रिलीजची तारीखजवळ येत जवळ आल्यामुले तो प्रचंड बिझी झाला आहे. प्रमोशनच्या वेळी अजयने त्याची मुलगी न्यासा देवगणच्या बॉलिवूडच्या स्वप्नांबद्दलही सांगितले.
रनवे 34 साठीच्या प्रमोशनल मुलाखतीदरम्यान अजय देवगणला विचारले गेले की त्याला आणि त्याची अभिनेत्री पत्नी काजोल यांना त्यांची मुले- न्यासा आणि युग यांचा चित्रपटांमध्ये प्रवेश करायचा आहे का? याला अजयने उत्तर दिले की न्यासा आणि युग यांच्यावर त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे दडपण नाही कारण ते त्यांना कधीही विशेष काही करण्यास सांगत नाहीत. मुले त्यांच्या भविष्यासाठी जे काही निर्णय घेतील त्यामध्ये त्यांना दोघेही मदत करतील. अजयने असेही म्हटले की, त्यांची मुले कोणताही मार्ग स्वीकारतील त्यावर त्यांनी विश्वास ठेवला पाहिजे आणि उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी कठोर परिश्रम घेतले पाहिजेत.