मुंबई - भारतात आता पॅन इंडिया चित्रपट तुफान कमाई करीत आहेत. दाक्षिणात्या भाषेत बनलेल्या बाहुबली, केजीएफ, पुष्पा अशा अनेक सिनेमांनी भाषेची बंधने ओलांडत देशभर प्रसिध्दी मिळवली. दाक्षिणात्य चित्रपट हिंदीमध्ये डब करुन चालतात. पण अद्यापही हिंदी चित्रपट दक्षिणेत फारसे चालत नाहीत. याच अनुषंगाने किच्चाला प्रश्न विचारण्यात आल्यानंतर तो म्हणाला, “हिंदी ही आता राष्ट्रभाषा राहिलेली नाही. तर सध्या संपूर्ण सिनेसृष्टी ही विविध भाषांवर चित्रपटांची निर्मिती करताना दिसत आहे. अनेक बॉलिवूडमधील निर्माते, दिग्दर्शक तेलुगू, तामिळमध्ये चित्रपट डब करत आहेत. पण त्यांना त्यातून हवे तितके यश मिळत नाही आणि त्याउलट आज आम्ही सर्वत्र चालणारे चित्रपट बनवत आहोत.”
यानंतर एका नव्या वादाला तोंड फुटले. अजय देवगणने ट्विट करुन किच्चाला विचारले की, "किच्चा सुदीप, माझ्या भावा, तुझ्या मते, जर हिंदी आपली राष्ट्रभाषा नसेल तर तुम्ही तुमच्या मातृभाषेतील चित्रपट हिंदीत डब करून का प्रदर्शित करता? हिंदी ही आमची मातृभाषा व राष्ट्रभाषा होती, आहे आणि कायम राहील. जन गण मन."