महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

तमिळ चित्रपट 'कैथी'च्या हिंदी रिमेकची अजय देवगणने केली घोषणा, शीर्षकही ठरले - तमिळ चित्रपट काथी हिंदी रिमेक

अभिनेता अजय देवगणने मंगळवारी सांगितले की, त्याचा आगामी अॅक्शन-ड्रामा 'भोला' हा चित्रपट 30 मार्च 2023 रोजी रिलीज होणार आहे. धर्मेंद्र शर्मा दिग्दर्शित या चित्रपटात तब्बू एका पोलिसाच्या भूमिकेत आहे.

अभिनेता अजय देवगण
अभिनेता अजय देवगण

By

Published : Apr 20, 2022, 10:27 AM IST

मुंबई- बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा आगामी चित्रपट ''रनवे 34'' लवकरच प्रदर्शित होणार आहे. अजयने त्याच्या पुढच्या चित्रपटाचीही घोषणा केली आहे. हिट तमिळ चित्रपट कैथीचा हा हिंदी रिमेक असणार आहे. या चित्रपटाचे शीर्षक भोला असणार असून हा एक अॅक्शन-ड्रामा चित्रपट असेल. 30 मार्च, 2023 रोजी हा चित्रपट देशबर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात तब्बू देखील एका सुपर-कॉपच्या महत्त्वपूर्ण भूमिकेत असणार आहे.

अजय देवगणने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर आगामी चित्रपटाची घोषणा करणारी एक पोस्ट शेअर केली. "भोला, तमिळ सुपरहिट कैथीचा अधिकृत रिमेक, ज्यात तब्बू आणि मी मुख्य भूमिकेत आहोत, ३० मार्च २०२३ रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे, तुम्हा सर्वांसोबत शेअर करण्यास उत्सुक आहे. अॅक्शन-ड्रामा धर्मेंद्र शर्मा यांनी दिग्दर्शित केला आहे," असे त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. .कॅप्शनमध्ये अजयने लिहिलंय, "अभिमानाने माझ्या पुढील उपक्रमाची घोषणा करत आहे भोला, 30 मार्च 2023 रोजी रिलीज होत आहे."

अजय देवगण फिल्म्स, टीसीरीज फिल्म्स, रिलायन्स एंटरटेनमेंट आणि ड्रीम वॉरियर पिक्चर्स निर्मित 'भोला'चे दिग्दर्शन धर्मेंद्र शर्मा करणार आहेत. दरम्यान, 'भोला' आणि 'रनवे 34' व्यतिरिक्त देवगणच्या आगामी चित्रपटांमध्ये 'थँक गॉड', 'मैदान' आणि 'दृश्यम 2' या चित्रपटांचा समावेश आहे.

हेही वाचा - भन्साळींच्या 'बैजू बावरा'मध्ये अजय देवगण साकारणार तानसेनची भूमिका?

ABOUT THE AUTHOR

...view details