मुंबई- अखेर 'दृश्यम 2' चित्रपटाचा उत्कंठा वाढवणारा टीझर रिलीज झाला आहे. अजय देवगण पुन्हा एकदा या सिनेमातून एक संयमी पण तितक्या बेरक्या व्यक्तीरेखेमध्ये मनोरंजन करण्यास सज्ज झालेला दिसत आहे. साळगावकर कुटुंबावर पुन्हा एकदा जुन्याच संकटाची सावली पडली आहे आणि अडचणीत आलेल्या कुटुंबाच्या मदतीला विजय पुन्हा कंबर कसून उभा आहे.
यापूर्वी अजयने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर 'दृश्यम-2' चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आणि लिहिले होते, '2 आणि 3 ऑक्टोबरला काय झाले ते आठवते, बरोबर? विजय साळगावकर पुन्हा एकदा कुटुंबासह परतला आहे. दृष्यम २ हा चित्रपट 18 नोव्हेंबर रोजी देशभर रिलीज होणार आहे.