मुंबई- अजय देवगण आणि सिद्धार्थ मल्होत्रा ( Ajay Devgn and Siddharth Malhotra ) यांची प्रमुख भूमिका असलेल्या थँक गॉड या चित्रपटाचा ट्रेलर ( Thank God trailer release ) शुक्रवारी रिलीज झाला आहे. अजय आणि सिद्धार्थचे दमदार काम ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. या चित्रपटात रकुल प्रीत सिंगही महत्त्वाच्या भूमिकेत आहे. याआधी अजय देवगणने 'थँक गॉड' चित्रपटातील त्याचा फर्स्ट लुक पोस्टर रिलीज केला होता, ज्यामध्ये अजय सूट-बूटमध्ये आहे आणि दाढीच्या लूकमध्ये दिसला होता. अजय राजाच्या खुर्चीवर रुबाबत बसला आहे.
पोस्टर शेअर करताना अजयने लिहिले होते की, 'या दिवाळीत तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय चित्रगुप्ताकडे गेम खेळण्यासाठी येत आहात, ट्रेलर उद्या येईल, चित्रपट 25 ऑक्टोबरला सिनेमागृहात प्रदर्शित होईल'.