मुंबई - अजय देवगण सध्या त्याच्या 'दृश्यम 2' चित्रपटाने थिएटरमध्ये धुमाकूळ घालत असतानाच त्याच्या आणखी एका चित्रपटाच्या पुढील भागाच्या बातम्या मीडियात येत आहेत. हा चित्रपट दुसरा कोणी नसून रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सिंघम' आहे. 'सिंघम 3' संदर्भात बॉलिवूडच्या कॉरिडॉरमधून एक मोठी बातमी समोर येत आहे.
अजय देवगण त्याच्या सिंघम फ्रँचायझी 'सिंघम अगेन'च्या तिसऱ्या भागासाठी चित्रपट निर्माता रोहित शेट्टीसोबत पुन्हा एकत्र येण्यासाठी सज्ज आहे. या वृत्तांत असा दावाही करण्यात आला आहे की, अजय त्याच्या आगामी 'भोला' चित्रपटाचे काम पूर्ण केल्यानंतर या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करेल. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्विट करुन या बातमीला दुजोरा दिला आहे.
रोहित शेट्टी आणि अजय देवगण यांनी या फ्रँचायझीच्या चित्रपटांसह याआधी दोनदा पडद्यावर थैमान घातले आहे. रोहित शेट्टीचा 'सिंघम' आणि 'सिंघम रिटर्न्स' प्रेक्षकांना खूप आवडला, ज्यामध्ये अभिनेता अजय देवगणने पोलिस इन्स्पेक्टर 'बाजीराव सिंघम'ची भूमिका साकारली होती. हरी गोपालकृष्णन यांनी दिग्दर्शित केलेल्या याच नावाच्या २०१० मध्ये आलेल्या तमिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक असलेल्या सिंघम चित्रपट रिलीज होऊन ११ वर्षे पूर्ण केली आहेत.
'सिंघम अगेन'बद्दलचे हे मीडिया रिपोर्ट्स ऐकून चाहते खूप खूश झाले आहेत. अजय आणि रोहित शेट्टीची जोडी चित्रपटाच्या पडद्यावर पाहण्यासाठी लोकांच्या मनात प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. एका चाहत्याने लिहिले आहे की, 'मी याबद्दल खूप उत्सुक आहे.' दुसऱ्याने लिहिले, 'मी खूप दिवसांपासून याची वाट पाहत होतो.' तर आणखी एकाने लिहिले आहे, 'ब्लॉकबस्टर येत आहे.' यावेळी अजय देवगण त्याच्या 'दृश्यम 2' चित्रपटासाठी वाहवा मिळवत आहे. अभिनेत्याचा अभिनय आणि चित्रपटाची कथा सर्वांनाच आवडली आहे. यासोबतच अभिनेता सध्या त्याच्या 'भोला' चित्रपटासाठी चर्चेत आहे.
हेही वाचा -उर्फी म्हणाली सनी लिओनीला, 'तू माझ्या ड्रेसशी स्पर्धा नाही करु शकत'