महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Aishwarya Rai in South Cinema : अजित कुमार, विघ्नेश शिवनसोबत भव्य चित्रपटात ऐश्वर्या रायची होणार दमदार एन्ट्री ?

पोन्नियन सेल्वन चित्रपटातील दमादार भूमिकेनंतर अभिनेत्री ऐश्वर्या रायची पुन्हा एकदा दाक्षिणात्य चित्रपटामध्ये दमदार एन्ट्री होण्याचे संकेत मिळत आहेत. दाक्षिणात्य सुपरस्टार अजित कुमार व ख्यातनाम दिग्दर्शक विघ्नेश शिवन हे AK 62 असे तात्पुरते शीर्षक असलेला चित्रपट बनवत असून यांत ऐश्वर्या राय काम करणार असल्याच्या बातम्या आहेत.

ऐश्वर्या रायची पुन्हा एकदा दाक्षिणात्य चित्रपटामध्ये दमदार एन्ट्री
ऐश्वर्या रायची पुन्हा एकदा दाक्षिणात्य चित्रपटामध्ये दमदार एन्ट्री

By

Published : Jan 18, 2023, 12:59 PM IST

Updated : Jan 18, 2023, 1:52 PM IST

Aishwarya Rai in South Cinema : अजित कुमार, विघ्नेश शिवनसोबत भव्य चित्रपटात ऐश्वर्या रायची होणार दमदार एन्ट्री ?

चेन्नई - तामिळ चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय स्टार अजित कुमार, प्रसिद्ध चित्रपट निर्माते विघ्नेश शिवन यांच्यासोबत तामिळ चित्रपटसृष्टीतील त्यांचा ६२ वा दमदार चित्रपट निर्माण करण्यासाठी सज्ज झाला आहे. AK 62 असे तात्पुरते शीर्षक असलेला हा बहुप्रतीक्षित चित्रपट लवकरच सुरू होणार आहे. अहवालानुसार, हा एक चित्रपट एक कॉमेडी थ्रिलर आहे, ज्यामध्ये अजित कुमार एक अनोक्या भूमिकेत दिसणार आहे. आता, विघ्नेश शिवन दिग्दर्शित या चित्रपटाची स्टारकास्ट जमावजमव सुरु झाली आहे.

ऐश्वर्या राय बच्चनच्या नावाची जदोरदार चर्चा - अहवालानुसार प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिचा AK 62 मध्ये अजित कुमारच्या नायिकेच्या भूमिकेसाठी विचार सुरु आहे. येथील आघाडीच्या वर्तमानपत्राने दिलेल्या बातमीनुसार ऐश्वर्या रायला चित्रपटाची कथा खूप आवडली आहे. या चित्रपटातील तिची व्यक्तीरेखा पाहता ती लवकरच हा चित्रपट साईन करेल. लवकरच सर्व स्टारकास्टची घोषणा होईल व यात ऐश्वर्याचे नाव असणार याची थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

अजित कुमार आणि विघ्नेश शिवनच्या प्रोजेक्टच्या जवळच्या सूत्रांनी सुचवले आहे की यात दोन नायिका असतील. आधी आलेल्या बातम्यांनुसार लोकप्रिय अभिनेत्री त्रिशा कृष्णन बहुप्रतिक्षित चित्रपटासाठी अजित कुमारसोबत पुन्हा एकत्र काम करणार आहे. या बहुप्रतिक्षित चित्रपटासाठी पोन्नियन सेल्वन फ्रँचायझीच्या मोठ्या यशानंतर त्रिशा ऐश्वर्या राय बच्चनसोबत पुन्हा एकत्र येणार आहे आणि या दोन्ही अभिनेत्रींच्या चित्रपटात तितक्याच महत्त्वाच्या भूमिका असतील. यामुळे अभिनेत्री ऐश्वर्या रायची पुन्हा एकदा दाक्षिणात्य चित्रपटामध्ये दमदार एन्ट्री होण्याचे संकेत मिळत आहेत.

दाक्षिणात्य चित्रपटातील ज्येष्ठ आणि दिग्गज अभिनेता अरविंद स्वामी यांना AK 62 चित्रपटामध्ये महत्त्वाच्या भूमिकेसाठी निश्चिकत केले जाणार आहे. अरविंद स्वामी आणि अजित कुमार पहिल्यांदाच एकत्र चित्रपटात काम करणार आहेत. तामिळ चित्रपट उद्योगातील दोन सर्वात चांगले दिसणारे अभिनेते म्हणून दोघेही ओळखले जातात.

प्रतिष्ठित तमिळ बॅनर, लायका प्रॉडक्शन्सद्वारे या चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे. या प्रॉडक्शन हाऊसचा अजित कुमारसोबतचा हा पहिलाच चित्रपट आहे व नानुम राउडी धान या त्याच्या पहिल्या चित्रपटानंतर दिग्दर्शक विघ्नेश शिवन दुसऱ्यांदा काम करत आहेत. या बॅनरने अलीकडच्या काळात पोनियिन सेल्वन फ्रँचायझी आणि आगामी मेगा बजेट उपक्रम इंडियन 2 यासह काही अपवादात्मक चित्रपटांची निर्मिती केली आहे.

हेही वाचा -पठाण वादानंतर चित्रपटावर अनावश्यक टीका टाळण्याचे पंतप्रधान मोदी यांचे पक्ष कार्यकर्त्यांना आवाहन

Last Updated : Jan 18, 2023, 1:52 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details