मुंबई - Pro Kabaddi league match : प्रो कबड्डी लीग सामाना सध्या सुरू आहेत. एनएससीआयने आयोजित केलेल्या मुंबईतील डोममध्ये बच्चन कुटुंबातील काही सदस्य जमले होते. अभिनेता अभिषेक बच्चनच्या जयपूर पिंक पँथर्सला प्रोत्साहन देण्यासाठी अभिताभ बच्चन, ऐश्वर्या राय बच्चनसह आराध्या देखील पोहचले होती. हा संघ आधीच गतविजेता होता. दरम्यान शनिवारी प्रो कबड्डी लीग पीकेएल सीझन 10च्या सामन्यात पिंक पँथर्सनं 'यू मुंबा'ला 41-31नं पराभूत केलं. आता एक ऐश्वर्या राय, अमिताभ बच्चन आणि आराध्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये बच्चन कुटुंब खूप उत्साहित दिसत आहे. व्हिडिओमध्ये बच्चन कुटुंबातील सदस्यांनी पिंक पँथर्सला प्रोत्साहित करण्यासाठी ब्लू ट्रॅकसूट घातला आहे.
बच्चन कुटुंबाचा व्हिडिओ व्हायरल :या व्हिडिओमध्ये अभिषेक, ऐश्वर्या, अमिताभ बच्चन आणि आराध्या हे पिंक पँथर्स प्रोत्साहन देत असून या संघाचा जयजयकार करताना दिसत आहेत. व्हायरल झालेल्या एका व्हिडिओच्या कमेंट विभागात एका चाहत्यानं लिहिलं, ''मी घटस्फोटाच्या अफवा पसरवणाऱ्यांना कोपऱ्यात रडताना ऐकू शकतो.'' दुसऱ्या एकानं लिहिलं, 'थँक गॉड टेन्शन दूर झालं. अशा अफवांबद्दल ऐकणे खूप वाईट आहे, विशेषतः ऐश्वर्यासाठी. देव बच्चन परिवाराला आशीर्वाद देवो.'' आणखी एका यूजरनं लिहिलं, ''आनंदी कुटुंब पाहणे खूप छान आहे.'' अशा अनेक कमेंट्स या फोटोवर येत आहेत. याशिवाय काहीजण या पोस्टवर हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करत आहेत.