महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Aishwarya and Aaradhya spotted : ऐश्वर्या आणि आराध्या बच्चन 'मायलेकी' अज्ञात स्थळी रवाना, विमानतळावर झाल्या स्पॉट - ऐश्वर्या आणि आराध्या बच्चन अज्ञात स्थळी रवाना

Aishwarya and Aaradhya spotted: अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि तिची मुलगी आराध्या बच्चन शुक्रवारी रात्री मुबंई विमानतळावर स्टाईलमध्ये स्पॉट झाल्या. दोघेही अज्ञात स्थळी रवाना झाल्याचं सांगण्यात येतंय.

Aishwarya and Aaradhya spotted
ऐश्वर्या आणि आराध्या बच्चन

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 30, 2023, 9:33 AM IST

मुंबई - Aishwarya and Aaradhya spotted: बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन चित्रपट निवडत असताना अतिशय जागरुक असते. ती आपला अधिकतर वेळ आपल्या कुटुंबासाठी देत असते. शुक्रवारी अज्ञात स्थळी रवाना होण्यासाठी विमानतळावर दाखल झालेली दिसली. तिच्यासोबत तिची लेक आराध्या बच्चनही होती. विमानतलावर ही मायलेकीची जोडी पोहोचताच हौशी फोटोग्राफर्सनी त्यांना आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं.

सोशल मीडियावर पापाराझी अकाऊंटवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ऐश्वर्या राय आणि तिची मुलगी आराध्या विमानतळावर स्टाइलमध्ये येताना दिसत आहेत. प्रवासासाठी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चननं काळ्या रंगाचा पोशाख परिधान केला होता. तिनं पूर्ण बाही असलेला गुडघ्यापर्यंतचा सैल पोशाख घातला होता आणि मॅचिंग पॅंट आणि शूजसह जोडला होता. तिने Dolce & Gabbana (डीजा ) या ब्रँडची एक काळी शाल आणि लक्झरी बॅग देखील सोबत बाळगली घेतली होती. मेकअप आणि केस मोकळे सोडत तिने क्लासिक लाल ओठांसह स्वतःला सजवलं होतं.

या प्रवासासाठी आराध्याने काळ्या पँटसह निळ्या रंगाचा स्वेटशर्ट घातलेला होता. तिनं आपली सिग्नेचर फ्री फ्रिंज्ड हेअरस्टाईल, गडद निळे हेअरबो आणि काळ्या शूजसह आपला लूक बनवला होता. आराध्या आणि ऐश्वर्या एकमेकांचा हात धरून विमानतळावर पोहोचल्या आणि गोड हसून पापाराझींना अभिवादन केलं.

ऐश्वर्या जेव्ही काही महत्त्वाच्या कामानिमित्य जाते तेव्हा ती आवर्जुन लेकीला सोबत ठेवत असते. यावर्षी कान्स फिल्म फेस्टीव्हलमध्येही ती आराध्यासह दाखल झाली होती. कान्सच्या रेड कार्पेटवर ती आराध्यासोबत चालताना दिसली होती. अमिताभ बच्चन आणि जया बच्चन या आजी आजोबांची आराध्या ही लाडकी नात आहे. बच्चन परिवार आराध्याच्या वाढदिवसापासून सर्व कार्यक्रमात एकत्र येताना दिसले आहे. ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन अनेकवेळा आराध्याच्या शाळेत पालक मिटींगसाठी, स्नेहसंमेलनात दिसले आहेत.

कामाच्या आघाडीवर ऐश्वर्या राय बच्चन काही महिन्यापूर्वी रिलीज झालेल्या मणिरत्नम दिग्दर्शित पोन्नियिन सेल्वन 2 या चित्रपटामध्ये दिसली होती. ऐश्वर्याशिवाय या चित्रपटात विक्रम, कार्ती, जयम रवी, त्रिशा, ऐश्वर्या लक्ष्मी, शोभिता धुलिपाला आणि प्रकाश राज यांच्याही भूमिका होत्या. पहिल्या भागातही ऐश्वर्यानं उत्तम व्यक्तीरेखा साकारली होती.

हेही वाचा -

1. Jackie Shroff Felt Proud : 'गणपथ'चा टीझर पाहून जॅकी श्रॉफला वाटला मुलाचा अभिमान, लिहिली हृदयस्पर्शी चिठ्ठी

2.Cauvery row protests: प्रकाश राजनं अभिनेता सिद्धार्थची 'कन्नडीगांच्या वतीने' मागितली माफी, जाणून घ्या काय आहे प्रकरण

3.Mumbai Diaries season 2 trailer out: वैयक्तिक समस्या बाजूला ठेवून जनतेच्या रक्षणासाठी मेडिकल टीम पुन्हा सज्ज

ABOUT THE AUTHOR

...view details