मुंबई -अभिनेता अर्जुन कपूर त्याचा 37 वा वाढदिवस पॅरिसमध्ये आणि तोही त्याची प्रेयसी मलायका अरोरासोबत साजरा करणार आहे. शुक्रवारी पहाटे अर्जुन आणि मलायका वाढदिवस साजरा करण्यासाठी पॅरिसला रवाना झाले. या जोडप्याला विमानतळावर अनेकजणांनी आपल्या कॅमेऱ्यात टिपले. अर्जुन कपूरचा २६ जून रोजी वाढदिवस आहे.
अर्जुनच्या जवळच्या स्त्रोताने त्याच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनबद्दल काही तपशील शेअर केले आहेत. "अर्जुनला अलीकडेच सुट्टी मिळाली नाही. त्याने त्याच्या चित्रपटांसाठी बॅक टू बॅक शूट केले आहे आणि त्याच्या फिटनेस प्रवासामुळे त्याला उसंत मिळाली नाही. अर्जुन एक व्हिलन 2 साठी जोरदार प्रमोशन करेल परंतु त्याआधी त्याला वाढदिवस शांतपणे घालवायचा आहे. तो मलायकासोबत पॅरिसला गेला आहे आणि ते दोघे जगातील सर्वात रोमँटिक शहरात एक आठवडा एकत्र घालवतील, असे सूत्राने सांगितले.
दोघे विमानतळावर आले तेव्हा शटरबग्स त्यांना क्लिक करत आणि फॉलो करत राहिले. हौशी फोटोग्राफर्सशी गप्पा मारत असतानाअर्जुननेही टोमणा मारला, "बस, इव्हेंट के लिए थोडे आये है, फ्लाइट लेनी है."