महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Allegation of Nawazuddin brother : पत्नीनंतर नवजुद्दीनच्या भावानेही केला 'नवाज स्वार्थी' असल्याचा आरोप - पत्नीनंतर नवाजुद्दीनच्या भावाचा आरोप

नवाजुद्दीन सिद्दीकीचे कुटुंब या अभिनेत्यावर खूश नसल्याचे दिसत आहे. पत्नी आलिया सिद्दिकीनंतर आता प्रसिद्ध अभिनेत्याचा भाऊ शम्स सिद्दीकी यानेही भावावर स्वार्थी असल्याचा आरोप केला आहे.

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Mar 1, 2023, 4:06 PM IST

मुंबई - प्रसिद्ध अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी हा गेल्या काही दिवसांपासून चुकीच्या कारणांमुळे चर्चेत आहे. त्याची विभक्त पत्नी आलिया सिद्दिकी हिने त्याच्यावर गंभीर आरोप केले होते आणि ती सध्या त्याच्यासोबत कायदेशीर लढाईही लढत आहे. यात भर म्हणून की काय आता नवाजचा भाऊ शम्स सिद्दीकीनेही भाऊ स्वार्थी असल्याचा धडधडीत आरोप केला आहे. भावाने नवाजुद्दीच्या व्यक्तीमत्वाचे काही पैलू उघड केले आहेत. त्याच्या या आरोपांचा विचार करता काही दिवसापूर्वी जे कंगना रनौतने गेल्या महिन्यात तिच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये नवाजचा बचाव करताना जे म्हटले होते त्याच्या अगदी विरुद्ध आहे.

शम्स सिद्दीकी हा एक चित्रपट निर्माता देखील आहे, त्याने नवाज आपल्या कुटुंबाची काळजी घेतो हे नाकारले नाही. परंतु, त्याने त्क्रा केली की नवाजने त्याच्या कुटुंबासाठी मालमत्ता खरेदी करत असताना, त्याने आपल्या भावाची कारकीर्द प्रस्थापित करण्यासाठी त्याच्या सामर्थ्याचा वापर केला नाही. शम्सने असेही म्हटले आहे की, नवाजुद्दीनची जनमानसात जी प्रतिमा आहे तशी ती नाही. शम्सच्या मते, त्याचा भाऊ एक कठीण व्यक्ती आहे जो लोकांना सोडून देतो. याची आलिया आणि मी अशी दोन उदाहरणे आहोत, असे शम्स म्हणाला.

आलिया आणि नवाजुद्दीनच्या नात्याबद्दल बोलताना शम्स म्हणाला की त्यांच्या वैवाहिक जीवनात स्थिरता नव्हती कारण सुरुवातीपासूनच अडचणी होत्या. घरातील भांडण सार्वजनिक ठिकाणी उघड करणाऱ्या आलियाच्या निर्णयाचा बचाव करताना शम्स म्हणाला की ती उघड्यावर येत आहे कारण तिची सहनशक्ती पातळी कमी झाली आहे. नवाजसोबतच्या नात्यात आलियाने खूप सहन केले आहे, असेही शम्स म्हणाला.

आपल्या भावाला 'स्वार्थी' आणि 'लोभी' असे लेबल लावणाऱ्या शम्स सिद्दीकीने, असाही आरोप केला आहे की नवाजने निर्मात्यांकडून त्याची देणी मिळेपर्यंत बोले चुडियां पॅचवर्कसाठी शूट करण्यास नकार दिल्यावर त्याला भाऊ म्हणूनही नाकारले. शम्सला हे कळले नाही कारण त्याच्या भावाने यापूर्वी अनेक दिग्दर्शक आणि निर्मात्यांना पाठिंबा दिला आहे आणि पैसे टोकन म्हणून मंटोला फक्त 1 रुपयात घेतले होते. बेलो चुडिंया या चित्रपटाचे दिग्दर्शन शम्स सिद्दीकीने केले होते. शम्स म्हणाला की त्याच्या भावाने 2019 मध्ये शुटिंग पूर्ण झालेल्या बोले चुडियां या चित्रपटाची तोडफोड का केली हे समजू शकले नाही परंतु अद्याप हा चित्रपट रिलीज झालेला नाही.

हेही वाचा -Sapna Gill Accused Prithvi Shaw : क्रिकेटर पृथ्वी शॉ अडचणीत; सपना गिलने केला प्रायव्हेट पार्टला स्पर्श केल्याचा आरोप

ABOUT THE AUTHOR

...view details