मुंबई : राकेश बापटसोबत ब्रेकअप झाल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री शमिता शेट्टीची लव्ह लाईफ पुन्हा चर्चेत आली आहे. शमिता पुन्हा प्रेम शोधत असल्याच्या अफवा सोशल मीडियावर फिरत आहेत. आमिर अलीने शमिताच्या गालावर अलविदा चुंबन घेतल्याच्या व्हिडिओने अनेकांच्या भुवया उंचावल्या आणि दोघे एकमेकांना डेट करीत असल्याच्या कयासांना उधाण आले.
अफवांना दिले प्रत्त्युत्तर :अफवांचे पेव सतत फुटत असताना, शमिताने सोशल मीडियावर अशा अनुमानांना तोंड देत चोख उत्तर दिले आहे. ट्विटरवर शमिताने स्पष्ट केले की ती “अविवाहित आणि आनंदी” आहे. तिने समाजाच्या "संकुचित विचारसरणी" बद्दलून त्याचा खरपूस समाचार घेतला. तिने लिहिले, मी माझ्या बद्दलच्या अफवांनी चकित झाले आहे आणि या प्रकारच्या मानसिकतेचा समाचार घेण्यासाठी मी विवेकपूर्वक या अफवांना उत्तर देणार आहे.
मन मोकळे करण्याची वेळ :43 वर्षीय अभिनेत्रीने पुढे लिहिले, "प्रत्येक कृती आणि प्रत्येक व्यक्तीची कोणतीही वास्तविकता तपासणी न करता छाननी किंवा निर्णय घेण्याच्या अधीन का आहे? NETIZENS च्या संकुचित कल्पनेच्या पलीकडे शक्यता आहेत." ती पुढे म्हणते, "आपण त्यासाठी आपले मन मोकळे करण्याची वेळ आली आहे. मी सिंगल आहे आणि हॅपी आहे. या देशातील आणखी महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करूया."