मुंबई - सुपरस्टार सलमान खान 27 डिसेंबर रोजी 57 वर्षांचा झाला. बॉलिवूडच्या भाईजानची बहीण अर्पिता खान शर्मा हिने तिच्या निवासस्थानी स्टार स्टडेड वाढदिवसाची पार्टी आयोजित केली होती. सलमानच्या 57 व्या वाढदिवसाच्या पार्टीत अनेक कलाकार उपस्थित होते. यामध्ये सुपरस्टार शाहरुख खान ते माजी गर्लफ्रेंड संगीता बिजलानी यांची सलमानच्या वाढदिवसाच्या पार्टीत खास उपस्थिती होती. सलमानच्या बर्थडे पार्टीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो संगीताच्या कपाळाचे चुंबन घेताना दिसत आहे.
सोमवारी रात्री अर्पिताच्या वांद्रे येथील निवासस्थानी सलमानच्या वाढदिवसानिमित्य सेलिब्रिटींची गर्दी होती. शाहरुख खान, कार्तिक आर्यन यासारख्या सेलेब्रिटींनी ही पार्टी अधिक आनंददायी बनवली. सलमानची कथित प्रेयसी युलिया वंतूर चमकदार काळ्या पोशाखात वावरताना दिसली. पार्टी संपल्यानंतर सलमान संगीताला तिच्या कारपर्यंत पोहोचवण्यासाठी सलमान स्वतः आला. माजी प्रेयसी असलेल्या संगीताचा निरोप घेताना सलमानने तिला जवळ घेत तिच्या कपाळाचे चुंबन घेतले.
पापाराझी मानव मंगलानीने त्याच्या इंस्टाग्राम पेजवर शेअर केल्यानंतर सलमान आणि संगीताचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 1994 मध्ये सलमानने संगीतासोबत जवळजवळ लग्न केल्याचे बोलले जात होते. सलमान आणि संगीता यांच्या लग्नाची आमंत्रणेही छापली गेली होती.
बातम्यांनुसार, बिजलानी आणि सलमान खानने १९८६ मध्ये एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. तेव्हा ते दोघे मॉडेलिंग करत होते आणि त्यांचे हे नाते १० वर्षे टिकले. २७ मे १९९४ रोजी सलमान आणि संगीता लग्न देखील करणार होते. परंतु मूळची पाकिस्तानी असलेली, हिंदी चित्रपट अभिनेत्री सोमी अली सोबत सलमान खानच्या वाढलेल्या जवळीकतेमुळे हे लग्न रद्द झाले. त्यांचे लग्न जरी झाले नसले तरी दोघांनी एकमेकांशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवले आहेत. संगीता सलमानसाठी कुटुंबातील सदस्याप्रमाणे आहे आणि खानदानातील महत्त्वाच्या प्रसंगी ती नेहमीच हजर असते.
संगीता बिजलानीची अभिनय कारकिर्द - संगीता बिजलानीने १९८७ मध्ये आदित्य पांचोली सोबत 'कातिल' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि त्यानंतर त्रिदेव, हाथयार, जुर्म, योधा, युगंधर, इज्जत आणि लक्ष्मण रेखा या चित्रपटांमध्ये काम केले. तिने दक्षिणात्य अभिनेता विष्णू वर्धन सोबत कन्नड भाषेतील 'पोलीस मत्थु दादा' चित्रपटात काम केले. हा चित्रपट हिंदी मध्ये त्याच सोबत 'इन्स्पेक्टर धनुष' नावाने पुनर्निर्मित झाला. विनोद खन्ना यांच्या सोबत 'जुर्म' चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री श्रेणीसाठी फिल्मफेअर पुरस्काराने नामांकन मिळाले होते आणि महेश भट्ट यांनी दिग्दर्शित केले होते. सलीम खान यांनी लिहिले आहे. तिने महेश भट्ट, मुकुल आनंद, जेपी दत्ता, राहुल रवैल आणि एन चंद्रा यांच्यासोबतही काम केले आहे.
हेही वाचा -तुनिषा शर्माचा जवळचा मित्र कंवर ढिल्लनने लिहिली हृदय पिळवटून टाकणारी पोस्ट