मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर हिने स्पेशल मॅरेज अॅक्ट अंतर्गत ६ जानेवारीला फहाद अहमदसोबत लग्नगाठ बांधली. अभिनेत्री स्वराने गुरुवारी सोशल मीडियाद्वारे फहादसोबत तिच्या लग्नाची घोषणा केली. नोंदणीकृत विवाहानंतर, स्वरा आणि फहाद आता एका बँड बाजा बारातवाली शादी करणार आहेत.
शुक्रवारी स्वराने स्पेशल मॅरेज अॅक्टचे स्वागत करत एक ट्विट शेअर केले की ती आपल्या प्रमाला संधी देत आहे. अभिनेत्री स्वराने पुढे म्हटले की, आवडीच्या जोडीदारावर प्रेम करण्याचा आणि लग्न करण्याचा अधिकार हा विशेषाधिकार नसावा. दुसर्या ट्विटमध्ये, स्वराने तिला आणि फहादला प्रेम आणि आशीर्वाद दिल्याबद्दल तिचे कुटुंब आणि मित्रांचे आभार मानले.
स्वरा आणि फहादचे लग्न मार्चमध्ये होणार आहे. या प्रसंगी जोडप्याची 'शहनाई-वाली शादी' असेल ज्यासाठी स्वरा खूप उत्सुक आहे. स्वरा भास्करने सांगितले की त्यांनी अद्याप लग्नाच्या सेलिब्रेशनची कोणतीही योजना आखली नाही आणि लग्नाच्या सेलिब्रेशनचे नियोजन किती काटकसरने करणार आहे हेही ती ठरवू शकलेली नाही.
स्वरा आणि फहाद यांना त्यांच्या लग्नाची घोषणा केल्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांचे आणि फॉलोअर्सचे प्रेम मिळाले. सोशल मीडियाच्या एका भागाने मात्र या जोडप्याला ट्विटरवर ट्रोल केले. काही जणांनी स्वराला एका ट्विटची आठवण करून दिली ज्यात तिने तिचा आताचा नवरा फहादला भैया म्हटले आहे. हे ट्विट या महिन्याच्या सुरुवातीचे आहे जेव्हा स्वराने फहादला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांचा एकत्र पोज देतानाचा फोटो शेअर केला.
स्वरा भास्कर CAA विरोधी निषेध रॅली दरम्यान फहादला भेटली होती. स्वरा ही अलिगढ मुस्लीम विद्यापीठाची माजी विद्यार्थिनी आहे आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS) मुंबई मधून एम.फिल पदवी प्राप्त केली आहे. सध्या फहाद महाराष्ट्रातील समाजवादी पक्षाच्या युवा शाखेचा प्रमुख आहे.
स्वरा भास्कर ही राजकीय विषयावर नेहमी भाष्य करत असते. ती तिच्या राजकीय मते रोखठोक बोलण्यासाठी ओळखली जाते. दिल्लीत गाजलेले शेतकऱ्यांचे आंदोलन असो की सीएए विरोधी आंदोलन किंवा जेएनयूमधील विद्यार्थांचे आंदोलन ते नेहमी आपली राजकीय भूमिका घेत असते. त्यामुळे तिला बऱ्याचदा ट्रोलचा सामनाही करावा लागला आहे. अलिकडे कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत झालेल्या राहुल गांधींच्या पदयात्रेतही ती सामील झाली होती. बॉलिवूडमध्ये खूप कमी कलावंत आहेत जे आपली राकीय भूमिका उघडपणे घेत आले आहेत, त्यापैकीच स्वरा भास्कर एक आहे.
हेही वाचा -Shehzada day 1 box office: कार्तिक आर्यनच्या भूल भुलैया 2 पेक्षा शेहजादाला कमी प्रतिसाद