महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Adipurush : रणबीर कपूरनंतर आता राम चरणही खरेदी करणार 'आदिपुरुष'ची १० हजार तिकिटे - buy 10000 tickets

रणबीर कपूरनंतर आता राम चरण वंचित मुलांसाठी आणि चाहत्यांसाठी 10,000 'आदिपुरुष' तिकिटे वितरित करत असल्याचे सांगितले जात आहे.

Adipurush
आदिपुरुष

By

Published : Jun 10, 2023, 5:45 PM IST

मुंबई : प्रभास आणि क्रिती सेनन स्टारर आदिपुरुष हा चित्रपट रिलीज होण्याची तारीख जवळ आली आहे. ओम राऊत दिग्दर्शित पौराणिक चित्रपच्याच्या प्रदर्शनाची वाट प्रेक्षक फार आतुरतेने पाहत आहे. हा चित्रपट लवकरच रूपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामुळे काही दिवसापूर्वी रणबीर कपूर हा चर्चेत आला होता. रणबीर कपूर हा वंचित मुलांसाठी आदिपुरुष या चित्रपटाची 10,000 तिकिटे हा वितरित करत असल्याचे समजले होते. आता रणबीरनंतर आरआरआर फेम राम चरण हा देखील वंचित मुलांसाठी आणि चाहत्यांसाठी 10,000 तिकिटे वितरित करत असल्याचे सांगितले जात आहे.

आदिपुरुष चित्रपट : या दोन अभिनेत्यांपूर्वी, अभिषेक अग्रवाल, ज्यांनी द काश्मीर फाईल्सची निर्मिती केली होती, त्यांनी 10,000 पेक्षा जास्त आदिपुरुष तिकिटे खरेदी करणार असल्याची घोषणा केली होती. अग्रवाल यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहले होते की, ते तेलंगणातील सरकारी शाळा, अनाथाश्रम आणि वृद्धाश्रमांमध्ये आदिपुरुष तिकिटे वितरित करणार आहेत. दरम्यान, तिरुपती येथील आदिपुरुष ट्रेलर कार्यक्रमादरम्यान, ओम राऊत यांनी चित्रपटाच्या निर्मात्यांना भगवान हनुमानसाठी चित्रपटगृहात एक जागा आरक्षित ठेवण्याची विनंती केली होती. राऊत यांचा असा विश्वास आहे की जेव्हाही रामायणाचे पठण केले जाते किंवा रामायण दाखवले जाते तेव्हा भगवान हनुमान त्यावेळी तिथे उपस्थित असतात. ‘आदिपुरुष’ या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता प्रभासने राघवची भूमिका साकारली आहे. तर क्रिती सेनॉन जानकीची भूमिका साकरली आहे. सैफ अली खान हा लंकेशच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय सनी सिंग हा लक्ष्मणच्या भूमिकेत दिसणार आहे. याव्यतिरिक्त या चित्रपटात अभिनेता देवदत्त नागे हा हनुमानाच्या भूमिकेत दिसणार आहे. आदिपुरुष हा चित्रपट महाकाव्य रामायणाची आधुनिक आवृत्ती आहे.

'आदिपुरुष' 16 जून प्रदर्शित होणार : 'आदिपुरुष' हा चित्रपट 16 जून रोजी हिंदी, तेलुगू, तामिळ, कन्नड आणि मल्याळममध्ये रिलीज होणार आहे. सैफ अली खान, सनी सिंग आणि देवदत्त नागे यांच्या प्रमुख भूमिका असलेले पौराणिक नाटक देशभरात ६२०० हून अधिक स्क्रीन्सवर प्रदर्शित केले जाणार आहे, तर हिंदीसाठी ४००० हून अधिक स्क्रीन मिळण्याची अपेक्षा आहे.

हेही वाचा :

  1. Varun Tej-Lavanya Tripathi engagement : वरुण तेज-लावण्य त्रिपाठी यांचा हैदराबादमध्ये झाला साखरपुडा
  2. Ileana DCruz : इलियाना डिक्रूझने सोशल मीडियावर करून दिली तिच्या जोडीदाराची ओळख
  3. SRKs Pathaan : शाहरुखचा पठाण रशियासह CIS मध्ये ३००० स्क्रिन्सवर झळकणार

ABOUT THE AUTHOR

...view details