मुंबई- भारतीय फिल्म इंडस्ट्रीमध्ये गेल्या काही वर्षात अनेकांनी आत्महत्या केल्या आहेत. सततचे तणाव, यश अपयश यांचा सामना, मिळालेली अफाट लोकप्रियता आणि नंतर गेलेले वैभव अशा अनेक निराशाजनक गोष्टी या इंडस्ट्रीचा अंगभूत दुर्गुन आहे. याचे शिकार लोक होतात. अगदी गुरुदत्त पासून सुरू झालेला आत्महत्येचा सिलसिला अद्यापही सुरू आहे. हिंदी सिने इंडस्ट्रीसोबतच आता प्रादेशिक फिल्म इंडस्ट्रीतूनही आत्महत्येच्या बातम्या अस्वस्थ करतात. अलिकडेच कन्नड भाषेतील संपत जयराम या तरुण अभिनेत्याने काम मिळत नाही या निराशेतून आत्महत्या केल्याचे उघड झाले होते. भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेचे आत्महत्या प्रकरणही ताजे आहे. तर आपण आज आत्महत्या केलेल्या कलाकारांबद्दल जाणून घेऊयात.
- कन्नड अभिनेता संपत जयराम
अभिनेता संपत जयरामने 22 एप्रिल रोजी त्याने नेलमंगला येथील राहत्या घरी आत्महत्या करून जीवन संपवले. अनेका काळापासून कन्नड फिल्म इंडस्ट्रीत तो सक्रिय होता. गेल्या काही दिवसापासून त्याच्याकडे काम नव्हते. याच निराशेतून त्याने आत्महत्या केल्याच्या बातम्या झळकल्या होत्या.
- भोजपूरी अभिनेत्री अभिनेत्री आकांक्षा दुबेची आत्महत्या
भोजपुरी चित्रपट अभिनेत्री आकांक्षा दुबे हिने 26 मार्च 2023 रोजी आत्महत्या केली. आकांक्षा दुबेने अनेक भोजपुरी गायक आणि अभिनेत्यांसोबत एक्तर काम केले आहे. त्याचं एक गाणं 26 मार्चला रिलीज होणार होतं. मात्र त्या आधीच तिच्या आत्महत्येची बातमी आल्याने बोजपूरी फिल्म इंडस्ट्री हादरली आहे.
- सुशांत सिंग राजपूत
बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येचे अद्यापही तपास यंत्रणांसाठी गूढच आहे. 14 जून 2020 रोजी सुशांतचा मृतदेह मुंबईतील वांद्रे येथील त्याच्या फ्लॅटमध्ये पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला होता. रिपोर्ट्सनुसार, सुपरहिट चित्रपटांमध्ये काम करणारा सुशांत सिंह राजपूत मानसिक तणावातून जात होता.
- संदीप नहार
टीव्ही आणि चित्रपट अभिनेता संदीप नहार यांनी 15 फेब्रुवारी 2021 रोजी आत्महत्या केली. संदीप नहारने सुशांत सिंग राजपूतसोबत एमएस धोनी या चित्रपटातही काम केले होते. याशिवाय तो अक्षय कुमारच्या केसरी या चित्रपटातही दिसला होता. संदीप नहारचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तो त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यावर नाराज होता.
- आसिफ बसरा
भारतीय चित्रपटसृष्टीत तसेच परदेशातही आपला ठसा उमटवणारा अभिनेता आसिफ बसरा याने १२ नोव्हेंबर २०२० रोजी आत्महत्या केली. 53 वर्षीय आसिफने धर्मशाला येथे आत्महत्या केली. त्याने ब्लॅक फ्रायडे, जब वी मेट, परजानिया आणि आउटसोर्स सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. पोलिस त्याच्या मृत्यूचा तपास करत आहेत. अभिनेता काहीशा मानसिक त्रासातून जात असल्याचे बोलले जात आहे.
- समीर शर्मा
टीव्ही अभिनेता समीर शर्मा 5 ऑगस्ट 2020 रोजी वयाच्या 44 व्या वर्षी त्याच्या मुंबईतील घरी मृतावस्थेत आढळला. ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ यासह अनेक प्रसिद्ध मालिकांमध्ये त्यांनी काम केले. आत्महत्या करण्यापूर्वी समीरने त्याच्या सोशल मीडिया पोस्टद्वारे आपण नैराश्यातून जात असल्याचे संकेत दिले होते. त्याने 20 जुलै 2020 रोजी सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून 'द कट' नावाची एक शॉर्ट फिल्म शेअर केली, ज्यामध्ये लॉकडाऊनमुळे होणारे मानसिक परिणाम दाखवले गेले.
- सुशील गौडा