मुंबई - virat kohli :भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील विश्वचषक सामन्यात विराट कोहलीनं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ईडन गार्डन्सवर शतक झळकावलं. सामन्याच्याच दिवशी त्याचा 35 वा वाढदिवस असल्यानं त्याने चाहत्यांना आपल्या शतकाचं 'रिटर्न गिफ्ट' दिलं. त्यानं 121 चेंडूत नाबाद 101 धावा केल्या. या खेळीमुळं टीम इंडियानं 50 षटकांत 5 विकेट गमावत 326 धावा करता आल्या. या सामन्यादरम्यान कोहलीची विनोदबुद्धीची पुन्हा एकदा प्रचिती आली. दक्षिण आफ्रिकेच्या डावातील पाचव्या षटकानंतर विराट मैदानावर नाचताना दिसला. विराटनं बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटातील गाण्यावर डान्स केला.
विराट कोहलीनं केला डान्स :सहावं षटक सुरू होण्यापूर्वी मैदानावर शाहरुखचं 'चलेया' हे गाणं वाजले. विराटनं हे गाणे ऐकल्यानंतर त्याचे पाय थिरकायला लागले आणि तो नाचू लागला. शेवटी त्यानं शाहरुख खानप्रमाणे हात पसरून प्रेक्षकांची मने जिंकली. सध्या विराटचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर भारतानं 234 धावांनी विजय मिळवल्यानं हा सामना एकतर्फी ठरला. विराटनं फिल्डींगदरम्यान पत्नी अनुष्का शर्माच्या 'ऐनवाई ऐनवाई' या गाण्यावर देखील डान्स केला. विश्वचषक 2023 मध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून सलग 8वा विजय नोंदवला. क्रिकेटच्या मैदानावरच त्याच्या चाहत्यानं देखील सेलिब्रेशनचा आनंद लुटला.