मुंबई - Elvish yadav case : यूट्यूबर आणि 'बिग बॉस ओटीटी 2' विजेता एल्विश यादवच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यानं आपल्यावरचे आरोप चुकीचं असल्याचं ट्विट करून सांगितले आहे. या प्रकरणात लवकरच आरोपीना शिक्षा होण्याची शक्यता आहे. एल्विशवर रेव्ह पार्टी आयोजित करणे, सापाचे विष पुरवणे आणि परदेशी मुली पुरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एक दिवसापूर्वी, पोलिसांनी एल्विश यादवला राजस्थानमध्ये पकडल्यानंतर, त्यानं नोएडा पोलिसांशी संपर्क साधला होता. नोएडा पोलिस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहे. पोलिसांनी एल्विशची सुटका केली आहे, मात्र हे प्रकरण सध्या खूप चर्चेत आहे.
एल्विश यादवनं केलं ट्विट : एल्विश यादवनं सापाच्या विषावर सुरू असलेल्या वादाच्या दरम्यान एक्सवर ट्विट करून आपले मत व्यक्त केले आहे. त्यानं ट्विटमध्ये लिहलं, 'नावाबरोबरच बदनामी होते, द्वेष करणारे लोकही वाढतात आणि भविष्यात माझ्यावर आणखी आरोप होतील यात मला आश्चर्य वाटणार नाही. माझी देवावर पूर्ण श्रद्धा आहे आणि श्रीरामजींवर श्रद्धा आहे. ही वेळही लवकरच निघून जाईल. रेव्ह पार्ट्यांमध्ये सापाच्या विषाच्या वादामुळं एल्विश यादवची चौकशी होत आहे. याआधी त्यानं एक व्हिडिओ बनवला होता आणि तो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता, ज्यामध्ये त्यानं आपल्यावरील सर्व आरोप निराधार असल्याचं सांगितलं होतं.