महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Kiara Advani lands in Hyderabad : पतीसोबत संडे एन्जॉय करुन कियारा अडवाणी शुटिंगकरिता हैदराबादमध्ये दाखल

सत्यप्रेम की कथा चित्रपटाचे शुटिंग संपल्यानंतर, कियारा अडवाणी एका दिवसात तिच्या पुढच्या चित्रपटाकडे वळली. अभिनेता राम चरण सहकलाकार असलेल्या तिच्या आगामी चित्रपट गेम चेंजरच्या टीममध्ये सामील होण्यासाठी ती हैदराबादला पोहोचली आहे.

कियारा अडवाणी हैदराबादमध्ये दाखल
कियारा अडवाणी हैदराबादमध्ये दाखल

By

Published : May 1, 2023, 11:05 AM IST

मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीने शनिवारी तिच्या आगामी हिंदी चित्रपट सत्यप्रेम की कथाचे शूट पूर्ण केले. खूप बिझी शेड्यूलनंतर, कियाराने तिचा अभिनेता पती सिद्धार्थ मल्होत्रासोबत मुंबईत रविवारचा आनंद लुटला. अभिनेत्री तिच्या आगामी 'गेम चेंजर' या चित्रपटाच्या शूटिंगसाठी रविवारी रात्री हैदराबादला पोहोचली आहे.

गेम चेंजरमध्ये कियारा आणि राम चरण दुसऱ्यांदा एकत्र- गेम चेंजर 2019 मध्ये रिलीज झालेल्या विनया विधेया रामामध्ये दोघांनी एकत्र काम केल्यानंतर राम चरणसोबत कियारा दुसऱ्यांदा एकत्र काम करत आहे. निर्मात्यांनी आधीच चित्रपटाचे अनेक शेड्याल्स तयार केली आहेत. कार्तिक आर्यनसोबत सत्यप्रेम की कथाच्या शूटिंगमध्ये बिझी असलेली कियारा हैदराबादमधील गेम चेंजर टीममध्ये सामील होणार आहे. तिच्या फॉलो्र्सना तिचा ठावठिकाणा सूचित करण्यासाठी कियाराने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर ही माहिती दिली आहे. कियारा अडवाणींनी सिद्धार्थसोबत तिच्या रविवारची झलकही शेअर केली. इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये तिने टाकलेले व्हिडिओ पाहिला तर दोघांनी आपला क्वालिटी टाईम घालवल्याचे दिसते. तिच्या सुट्टीच्या दिवसाची एक झलक शेअर करताना, कियाराने लिहिले, 'रविवार चांगला घालवला.

कियाराची इन्स्टा स्टोरी

गेम चेंजर हा पोलिटीकल चित्रपट - मार्चमध्ये, कियाराने हैद्राबादमध्ये एका शेड्यूलसाठी शूट केले होते आणि चित्रपटातील अभिनेता राम चरणचा वाढदिवस आगाऊ साजरा करून ती मुंबईला परतली होती. चित्रपटातील कथानक, कियारा आणि राम चरण यांनी साकारलेल्या भूमिकांबद्दल फारसे काही माहिती नाही. चित्रपटाभोवतीची चर्चा मात्र सध्याच्या राजकारणाच्या कॅनव्हाससह एक अॅक्शन ड्रामा असल्याचे सूचित करते.

आरआरआरनंतर राम चरणचा पिहला चित्रपट - आगामी चित्रपट हा बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे कारण तो ब्लॉकबस्टर हिट आरआरआर नंतरचा राम चरणचा पहिला चित्रपट असेल. एस शंकर दिग्दर्शित, गेम चेंजर तेलुगू, तमिळ आणि हिंदी या तीन भाषांमध्ये प्रदर्शित होईल. या चित्रपटात एसजे सूर्या, जयराम, अंजली आणि श्रीकांत यांच्याही भूमिका आहेत. निर्मात्यांनी गेम चेंजरची रिलीज डेट अद्याप लॉक केलेली नाही.

हेही वाचा -Rishi Kapoor Death Anniversary : नीतू कपूर, मुलगी रिद्धिमा कपूर यांनी दिवंगत ऋषी कपूर यांच्या पुण्यतिथीनिमित्त शेअर केले फोटो...

ABOUT THE AUTHOR

...view details