महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Afalathoon release date : आंधळा, मुका आणि बहिऱ्या मित्रांची अतरंगी धमाल चित्रपट ‘अफलातून’! - Afalathoon in theaters

आंधळा, मुका आणि बहिरा असे तीन जिवलग डिटेक्टिव्ह मित्र एका मुलीला एक केस सोडविण्यात मदत करतात, अशी कथा असलेला अफलातून हा मराठी चित्रपट झळकणार आहे. ‘अफलातून’ येत्या २१ जुलैला महाराष्ट्रातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

Afalathoon release date
अतरंगी धमाल चित्रपट ‘अफलातून’

By

Published : Jun 28, 2023, 7:43 PM IST

मुंबई - बऱ्याच वर्षांपूर्वी तीन बंदर नावाचे हिंदी नाटक आले होते ज्यात आंधळा, मुका आणि बहिऱ्या मित्रांची एका सुंदर मुलीला मदत करतानाची धडपड दाखविताना होणारी तारांबळ दर्शवण्यात आली होती. त्यातून होणारे विनोद प्रेक्षकांना आवडले होते. त्यानंतर काही वर्षांनी मराठी नाटक ऑल दि बेस्ट रंगमंचावर आले होत आणि त्यातही आंधळा, मुका आणि बहिऱ्या मित्रांची एका सुंदर मुलीला इंप्रेस करण्याची शर्यत सुरू असते. त्यातून होणाऱ्या विनोदी प्रसंगांतून प्रेक्षकांचे मनोरंजन होत असे. आता पुन्हा एकदा आंधळा, मुका आणि बहिऱ्या मित्रांची कथा आली आहे परंतु मोठ्या पडद्यावर.

अफलातून चित्रपटातून तीन जिवलग डिटेक्टिव्ह मित्र एका मुलीला एक केस सोडविण्यात मदत करतात. परंतु एक आहे आंधळा, दुसरा मुका तर तिसरा बहिरा. हे तिघे म्हणजेच श्री, आदि आणि मानव डिटेक्टिव्हगिरी करण्यात उस्ताद असतात. ते एका फसवल्या गेलेल्या दुर्देवी मारिया नावाच्या मुलीला मदत करण्याचा चंग बांधतात. त्यांच्या शारीरिक व्यंगांमुळे होणाऱ्या गमती जमतीने हा चित्रपट भरला असून ते मारियाला मदत करताना येणाऱ्या अडचणीवर कसे मात करतात हे 'अफलातून’ मधून दिसणार आहे आणि तेही रंजक पद्धतीने. ते एका प्रकरणाचा छडा कशा मजेशीर प्रकारे लावतात हे बघताना प्रेक्षकांना विनोदाची मेजवानी मिळणार आहे.

अफलातून

'अफलातून’ चे लेखन परितोष पेंटर याने केले असून दिग्दर्शनही त्यांनीच केले आहे. चित्रपटाचे निर्माते आहेत. साहा अँड सन्स स्टुडिओज, आयडियाज द एंटरटेन्मेन्ट कंपनी आणि राजीव कुमार साहा. तसेच सहनिर्मिती केली आहे ग्रुप एम मोशन एंटरटेन्मेन्ट, अवधूत डिस्ट्रिब्युटर आणि स्वर्ण पटकथा यांनी. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित केले असून त्यातून अफरातफरी ची गडबड लक्षात येते. 'अफलातून’ ची पटकथा परितोष पेंटर यांचीच असून संदीप दंडवते यांनी संवादलेखन केले आहे. सुरेश देशमाने यांची सिनेमॅटोग्राफी असून संकलनाची जबाबदारी सांभाळली आहे सर्वेश परब यांनी. संगीतकार कश्यप सोमपुरा असून गीते लिहिली आहेत मंदार चोळकर याने तर अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांनी पार्श्वगायन केले आहे. या चित्रपटात सिद्धार्थ जाधव, जॉनी लिव्हर, श्वेता गुलाटी, तेजस्विनी लोणारी, विजय पाटकर, भरत दाभोळकर, परितोष पेंटर, जयेश ठक्कर, जेसी लिव्हर, विष्णू मेहरा रेशम टिपणीस, अशी तगडी स्टारकास्ट आहे. एका अशक्य केसची अफलातून स्टोरी, ‘अफलातून’ येत्या २१ जुलैला महाराष्ट्रातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details