मुंबई - Adivi Shesh first look : साऊथ अभिनेता आदिवी शेष आणि अभिनेत्री श्रुती हासन अॅक्शन ड्रामामध्ये स्क्रीन स्पेस शेअर करताना दिसणार आहेत. दरम्यान आदिवी शेषचा फर्स्ट लूक आज, 14 डिसेंबर रोजी रिलीज करण्यात आला. या चित्रपटाच्या निर्मात्या सुप्रिया यारलागड्डा आहेत. हा चित्रपट अन्नपूर्णा स्टुडिओद्वारे निर्मित असेल, ज्याचे दिग्दर्शन शेनील देव करत आहे. त्याचबरोबर या चित्रपटात श्रुती हासन मुख्य भूमिकेत असेल. याशिवाय या चित्रपटाचे सहनिर्माते सुनील नारंग आहेत. आदिवी शेषनं फर्स्ट लूक पोस्टर शेअर करत लिहिलं, ''सरप्राईज हा बॉलीवूड चित्रपट नाही किंवा टीएफआय (TFI) चित्रपट नाही. हा एक पॅन इंडिया सिनेमा आहे''. याशिवाय या पोस्टवर त्यानं हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट केला आहे. या पोस्टवर आदिवीनं सांगितलं की, 18 डिसेंबर रोजी या आगामी चित्रपटाचं शीर्षक रिलीज होणार आहे.
आदिवी शेषचा फर्स्ट लूक : आदिवी शेषच्या या पोस्टवर अनेकजण कमेंट करून त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. एका चाहत्यानं लिहिलं, ''सर तुम्ही खूप हॅन्डसम दिसता, तुम्ही महेश बाबूला देखील देखणेपणात हरवू शकता''. दुसऱ्या एका चाहत्यानं लिहिलं, आदिवी, मी तूझी खूप मोठी चाहती आहे, तुझा चित्रपट मी नक्की पाहणार''. आणखी एकानं लिहिलं, ''सर मी तुमच्या या चित्रपटाची वाट पाहेन. हा चित्रपट खूप जबरदस्त असणार आहे.'' अशा अनेक कमेंटस् या व्हिडिओवर येत आहेत. याशिवाय काहीजण या पोस्टवर हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करत आहेत. दरम्यान, आदिवी शेषनं त्याच्या हिट तेलुगू चित्रपट 'गुडाचारी'चा सीक्वेल असलेल्या 'जी2'च्या शूटिंगलाही सुरुवात केली आहे.