मुंबई- बॉलिवूड अभिनेता आदित्य रॉय कपूरची फिमेल फॅन्समध्ये असलेली क्रेझ सर्वांहून वेगळी आहे. तो जिथेही जातो तिथे त्याची एक झलक पाहण्यासाठी तरुणींचा घोळका जमा होतो. त्याला कॅमेऱ्यात बंद करण्यासाठी, त्याच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी या पोरी धडपडत असतात. अलिकडेच तो द नाईट मॅनेंजरच्या प्रमोशनसाठी गेला असताना एक महिलेने त्याचे चुंबन घेण्याचा प्रयत्न केला होता. याचे सविस्तर वृत्त आम्ही दिले होते.
काय घडला होता प्रसंग- आदित्य रॉय कपूरला पाहून काही महिला फॅन्स त्याच्याकडे धावत आल्या व त्यांनी सेल्फीची मागणी केली. तो त्या फिमेल फॅन्सना नाराज करु इच्छित नव्हता. त्याने गुमान त्यांना सेल्फीची परवानगी दिली. सेल्फी होताच त्या महिलने त्याला ओढत चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. पण आदित्यने नम्र नकार देत तिला दूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या महिलेने पुन्हा जोरकस प्रयत्न करत चुंबन घेण्याचा प्रयत्न केला.
आदित्यबाबत असे प्रसंग अनेकवेळा घडतात. तोही दरवेळा नवा अनुभव घेत फॅन्सच्या गराड्यात स्वतःला आनंदी ठेवत असतो. या घटनेकडे तो कसे पाहतो असे विचारले असता, आदित्यने सांगितले की, तो यामुळे फारसा दचकला नाही. तो म्हणाला की अशा घटना हाताळणे आवश्यक आहे आणि जेव्हा एका मुलीने आदित्यचा चेहरा धरला आणि स्क्रीनिंगमध्ये त्याचे चुंबन घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने हेच केले. या घटनेबद्दल बोलताना आदित्यने सांगितले की, ज्या चाहत्याने त्याच्यासोबत मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो बलवान होता.