मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर त्यांच्या कथित नात्यामुळे फार चर्चेत आहेत. हे जोडपे २०२२ मध्ये क्रिती सॅननच्या दिवाळी पार्टीत एकत्र दिसले होते, तेव्हापासूनच त्यांच्या डेटिंगच्या अफवा सुरू झाल्या होत्या. अनेकदा हे जोडपे वेगवेगळ्या ठिकाणी एकत्र दिसतात. आता देखील असेच काही झाले आहे. पुन्हा एकदा हे जोडपे चर्चेत आले आहे, दोघे नुकतेच स्पेनमधील एका रॉक कॉन्सर्टमध्ये एकत्र दिसले. त्यानंतर त्यांच्या नात्याबद्दल आणखी सोशल मीडियावर बोलल्या जात आहे. आदित्य आणि अनन्या यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर आर्क्टिक मंकीज कॉन्सर्टमधील काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत.
अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर दिसले एकत्र : मंगळवारी, अनन्याने इंस्टाग्रामवर स्टोरीजवर एक फोटो शेअर केला, ज्यामध्ये ती स्पेनमधील कॉन्सर्टचा आनंद घेत होती. फोटो शेअर करत तिने लिहले, 'यात माझ्या आवडत्या गाण्यासारखे काहीही नाही.' (हार्ट इमोजी). तिने फोटोत माद्रिद, स्पेनचे जिओटॅग वापरले आहेत. दुसरीकडे आदित्यने कॉन्सर्टमधील कलाकारांचा एक व्हिडिओ शेअर केला. त्याने या पोस्टवर थंडमधील एक इमोजीसह माकडचा इमोजी पोस्ट केला आहे. आता या डेटिंगच्या अफवांमध्ये, आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे स्पेनमध्ये एकत्र एका कार्यक्रमात उपस्थित होते. त्यामुळे पुन्हा एकदा डेटिंग अफवांना हवा भेटली आहे.