कान्स (फ्रान्स) - 76 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये बॉलिवूड अभिनेत्री अदिती राव हैदरीने तिच्या अदांनी सर्वांची मने जिंकली. स्काय ब्ल्यू रंगाच्या ऑस्कर दे ला रेंटा पोशाखात सुंदर परीसारखी दिसणारी अदिती फ्रेंच रिव्हिएरामधून बाहेर पडली. तिने इन्स्टाग्रामवर गाऊनमधील स्वतःचे अनेक फोटो पोस्ट केले आहेत.
कान्समध्ये अदितीचा राजकुमारीसारखा वावर - या सोहळ्यातील अदितीचा वावर एखाद्या लाडक्या राजकुमारीसारखा भारदस्त होता. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये लॉरिअल पॅरिस या ब्रँडचे प्रतिनिधीत्व करत असलेल्या अदितीने या पोस्टला कॅप्शन देताना लिहिले की, 'कान्स २०२३ वॉक युवर वर्थमध्ये तुम्हाला पुन्हा भेटून आनंद झाला'. तिच्या या लूकला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला.
अदितीच्या सोशल मीडियावरील या फोटोंवर चाहत्यांनी प्रतिक्रियां देताना अजिबात हयगय केलेली नाही. लोक तिच्या सौंदर्याचे, आत्मविश्वासाचे, ड्रेस आणि साधेपणाचेही कौतुक करत आहेत. फॅशन स्टायलिस्ट अनैता श्रॉफ अदजानिया यांच्यासह अनेक सेलेब्रिटीही तिच्या पोस्टवर व्यक्त होत आहेत.
अभिनेता सिद्धार्थची कमेंट- अदितीचा कथित बॉयफ्रेंड आणि अभिनेता सिद्धार्थने देखील या फोटोवर प्रतिक्रिया दिली. 'ओह माय... असे लिहित त्याने हार्ट आय इमोजी आणि फायर इमोजी,' टाकले आहेत. आदितीने २०२२ मध्ये सब्यसाची साडीने कान्समध्ये पदार्पण केले होते. दरम्यान, चित्रपटाच्या आघाडीवर, अदिती इंडो-यूके सह-निर्मिती लायनेसमध्ये काम करण्यासाठी सज्ज आहे.
अदितीचे आगामी चित्रपट- 2008 मध्ये दोन्ही देशांनी हस्ताक्षर केलेल्या द्विपक्षीय करारांतर्गत अधिकृत इंडो-यूके सह-निर्मिती असलेल्या लायनेसची घोषणा सध्या सुरू असलेल्या कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये इंडिया पॅव्हेलियन (माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीत FICCI द्वारे व्यवस्थापित) येथे करण्यात आली. . प्रिन्सेस सोफिया दुलीपच्या कथेचा शोध घेणारे इतिहासकार पीटर बॅन्स यांच्या संशोधनातून प्रेरित असलेला हा चित्रपट ब्रिटनमध्ये एका शतकाच्या अंतरावर राहणाऱ्या दोन ब्रिटिश पंजाबी महिलांची कथा आहे.पीटर हा चित्रपटाच्या कार्यकारी निर्मात्यांपैकी एक आहे. अदितीकडे संजय लीला भन्साळी यांची हीरामंडी हा चित्रपटदेखील आहे.
हेही वाचा -The Kerala Story : २०० कोटी कमावणारा पहिला फिमेल लिड चित्रपट असल्याचा अदा शर्माचा दावा