मुंबई - खूप काळापासून ज्या चित्रपटाच्या ट्रेलरची प्रेक्षक वाट पाहात होते त्या आदिपुरुषचा बहुप्रतिक्षित ट्रेलर अखेर ९ मे रोजी प्रदर्शित झाला. ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष हे महाकाव्य रामायणावर आधारित एक पौराणिक नाट्यमय चित्रपट आहे. यात सुपरस्टार प्रभासने राघवची भूमिका केली आहे, तर क्रिती सेनॉनने जानकीची भूमिका केली आहे, तर या चित्रपटात सनी सिंगने लक्ष्मणाची भूमिका साकारली आहे. पवनपुत्र हनुमानाची भूमिका मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे साकारत आहे. जय मल्हार चित्रपटात त्याने खंडोबाची भूमिका केल्यानंतर त्याची लोकप्रियता अफाट वाढली होती. वीर हनुमान साकारताना पाहणे हे निश्चितच प्रेक्षकांसाठी आनंददायी असणार आहे.
आदिपुरुषचा ट्रेलर ७० देशात रिलीज - अभिनेता सैफ अली खान चित्रपटात लंकेशची भूमिका साकारतो आहे. आदिपुरुष ट्रेलर केवळ भारतातच नाही तर कॅनडा, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, युनायटेड किंगडम, मलेशिया, न्यूझीलंड, सिंगापूर, रशिया, इजिप्त आणि इतर ७० देशांमध्ये रिलीज झाला आहे. गुरुवारी इंस्टाग्रामवर मुख्य कलाकारांनी त्यांच्या संबंधित सोशल मीडिया हँडलवर ट्रेलर शेअर केला.
आदिपुरुषचा वर्ल्ड प्रीमियर - आदिपुरुष 13 जून रोजी न्यूयॉर्कमधील ट्रिबेका फिल्म फेस्टिव्हलमध्ये सादर केला जाईल, असे चित्रपट निर्मात्यांनी सांगितले. आदिपुरुषचा वर्ल्ड प्रीमियर द ट्रायबेका फेस्टिव्हल, न्यू यॉर्क येथे होईल याचा मला सन्मान वाटतो, अशी प्रभासने प्रीमियरबद्दल कमेंट केली. आपल्या देशाची मूल्ये प्रतिबिंबित करणार्या प्रकल्पाचा भाग बनणे हा एक सन्मान आहे. आदिपुरुष, जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचणे, मला केवळ एक अभिनेता म्हणूनच नाही तर एक भारतीय म्हणूनही खूप अभिमान वाटतो. ट्रिबेका येथे प्रेक्षकांची कशी प्रतिक्रिया आहे हे पाहण्यासाठी मी उत्सुक आहे, असे त्याने आपल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत म्हणाले, 'आदिपुरुष हा चित्रपट नाही, तर ती एक भावना आणि संवेदना आहे. भारताच्या आशयाला मूर्त रूप देणारी कथा ही आमची संकल्पना आहे.' व्यावसायिक आघाडीवर, प्रभास दीपिका पदुकोण सोबत आगामी अॅक्शन चित्रपट सालार, तसेच प्रोजेक्ट के मध्ये देखील दिसणार आहे.
हेही वाचा -Anupam Kher On The Kerala Story : अनुपम खेर यांनी 'द केरळ स्टोरी' चित्रपटाला विरोध करणाऱ्यावर केली टीका