महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'आदिपुरुष'चा फर्स्ट लूक, धनुष्यधारी रामाच्या भूमिकेत प्रभास

Adipurush First Look Poster: प्रभासचा आगामी चित्रपट 'आदिपुरुष'चे पहिले भव्य पोस्टर 30 सप्टेंबर रोजी रिलीज झाले आहे. चित्रपटाचा पहिला टीझर आणि पोस्टर 2 ऑक्टोबर रोजी 7 वाजून 11 मिनिटांनी प्रदर्शित होणार आहे.

Etv Bharat
'आदिपुरुष'चा फर्स्ट लूक

By

Published : Sep 30, 2022, 10:21 AM IST

मुंबई- Adipurush First Look Poster: साऊथचा सुपरस्टार प्रभासचा आगामी चित्रपट 'आदिपुरुष'चे पहिले भव्य पोस्टर 30 सप्टेंबर रोजी रिलीज झाले आहे. चित्रपट निर्मात्याने सोशल मीडियावर चित्रपटाचे पोस्टर शेअर करून ट्रेलर आणि चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख देखील जाहीर केली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत यांनी सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. चित्रपटाचा पहिला टीझर आणि पोस्टर 2 ऑक्टोबर रोजी 7 वाजून 11 मिनिटांनी प्रदर्शित होणार आहे.

कसे आहे आदिपुरुषचे फर्स्ट लूक पोस्टर - आदिपुरुष चित्रपटाच्या फर्स्ट लूक पोस्टरबद्दल सांगायचे तर, साऊथ अभिनेता प्रभास भगवान 'राम'च्या भूमिकेत असून तो आकाशाकडे पाहात बाणांनी निशाणा साधत आहे. प्रभासचे लांब आणि कुरळे केस आणि मिशा त्याच्या लूकला पूरक आहेत.

काय म्हणाला चित्रपटाचा दिग्दर्शक - ओम राऊत यांनी चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज करताना लिहिले, 'आरंभ..., अयोध्येतील शरयू नदीच्या काठावर, आमच्या या जादुई प्रवासाच्या सुरुवातीचा एक भाग व्हा. उत्तर प्रदेश'. यासोबतच दिग्दर्शकाने सांगितले की, चित्रपटाचा पहिला टीझर आणि पोस्टर २ ऑक्टोबरला रिलीज होणार आहे.

चित्रपटाची स्टारकास्ट- ओम राऊत दिग्दर्शित या चित्रपटात प्रभास, सैफ अली खान, क्रिती सेनॉन आणि सनी सिंह मुख्य भूमिकेत असणार आहेत. अनेक दिवसांपासून चाहते या चित्रपटाची वाट पाहत होते. हा चित्रपट 12 जानेवारी 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

बिग बजेट चित्रपट आहे आदिपुरुष - मीडिया रिपोर्ट्सनुसार, आदिपुरुष हा चित्रपट जवळपास 500 कोटींच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला आहे. प्रभास भगवान रामच्या भूमिकेत तर सैफ अली खान लंकापती रावणाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आता चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये असलेली उत्कंठता वाढणार हे नक्की.

हेही वाचा -विक्रम वेधा जगभरात तब्बल ५६४० स्क्रिन्सवर झळकणार, विक्रमासाठी ह्रतिक आणि सैफ सज्ज

ABOUT THE AUTHOR

...view details