हैदराबाद- आदिपुरुष टीझरवर तीव्र प्रतिक्रिया मिळाल्यानंतर, प्रभास आणि क्रिती सेनॉन यांच्या मुख्य भूमिका असलेल्या चित्रपटाच्या निर्मात्यांनी प्रमोशनल कंटेंटचे लॉन्चिंग पुढे ढकलले आहे. मात्र चित्रपटाची टीम आता जूनमध्ये आदिपुरुषच्या रिलीजसाठी मुख्य जोडीवर पूर्ण विश्वास बाळगून असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
चित्रपट आणि प्रमुख जोडीवर नव्याने विश्वास दाखवून तयार असल्याचे दिसते. प्रचंड ट्रोलिंग दरम्यान, आदिपुरुष टीझर ड्रॉप झाल्यानंतर प्रभास आणि क्रितीची ऑनस्क्रीन जोडी ही एकमेव गोष्ट होती ज्याला प्रेक्षकांचे प्रेम मिळवले. या दोघांनी त्याच्या अवतीभवती इतकी चर्चा रंदू दिली की काही लोकांनी दोघांच्यात डेटिंग चालू असल्याच्या अफवा पसरेपर्यंत चालू राहिली. अजूनही काहीजण या चर्चेतून बाहेर पडायला तयार नसतात.
आदिपुरुष एडिटर आशिष म्हात्रे यांनी व्हीएफएक्स बाजूला ठेवून, प्रभास आणि क्रितीचे एकत्र दृश्य हे चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये वापरण्यास सुरूवात केलीा आहे. टिझरला तुफान ट्रोलचा सामना करावा लागल्यानंतर चित्रपटाच्या टीमने यातील व्हिएफएक्स नव्याने बनवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये रावणाच्या लूकपासून ते अनेक महत्त्वाची दृष्ये पुन्हा बनवली जात आहेत व वादात अडकणार नाहीत याची पूर्ण काळजी घेऊन एडिट केली जात आहेत.