महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Adipurush dialogue writer : आदिपुरुष संवाद लेखक मनोज मुंतशीर यांनी लोकांच्या भावना दुखावल्याबद्दल माफी मागितली - संवाद लेखक मनोज मुंतशीर यांची माफी

'आदिपुरुष' या वादग्रस्त चित्रपटाचे संवाद लेखक मनोज मुंतशीर यांनी सोशल मीडियाद्वारे पोस्ट शेअर करून माफी मागितली आहे. या माफीच्या पोस्टवर लोकांनी पुन्हा एकदा मनोजला खडे बोल सुनावले आहेत.

Adipurush
आदिपुरुष

By

Published : Jul 8, 2023, 12:50 PM IST

मुंबई : देशभरात विरोध होत असलेल्या 'आदिपुरुष' या वादग्रस्त चित्रपटाबाबत लोकांमध्ये असलेला राग अजूनही संपलेला नाही. ‘आदिपुरुष’ या चित्रपटामुळे लोकांच्या श्रद्धा तर दुखावल्याच, पण रामभक्तांच्या भावनाही दुखावल्या गेल्या आहेत. देशभरात, 'आदिपुरुष'च्या रचनेला रामानंद सागर यांच्या 'रामायण' मालिकेची खराब प्रत म्हणून संबोधले जात आहे. चित्रपटाचे लेखक मनोज मुनताशीर, यांनी या चित्रपटाचा टोपोरी संवाद लिहिलेला आहे. त्यामुळे 'रामायण' आणि भगवान रामाचा अपमान केल्याचा आरोप देखील मनोज मुनताशीर, आणि ओम राऊतवर करण्यात आला आहे. दरम्यान आता संवाद लेखक मनोज मुंतशीर यांना आपली चूक कळली असून त्यांनी हात जोडून संपूर्ण देशासमोर रामभक्तांची माफी मागितली आहे. यासंदर्भात मनोजने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये मनोजने माफी मागितली आहे.

संवाद लेखक मनोज मुंतशीर यांची माफी : 'आदिपुरुष'वर नाराज आणि संतापलेले लोक पाहून मनोजने आपली चूक झाल्याचे मान्य केले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, 'आदिपुरुष चित्रपटामुळे जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत हे मी स्वीकारतो, मी माझ्या सर्व बंधू-भगिनी, ज्येष्ठ, पूज्य, साधु-संत आणि श्री राम भक्तांना मी हात जोडून माफी मागतो. भगवान बजरंगबली आम्हा सर्वांना आशीर्वाद देवो, अखंड राहून आपल्या पवित्र सनातन आणि महान देशाची सेवा करण्याचे सामर्थ्य आम्हाला देवो. असे त्यांनी पोस्टमध्ये लिहले आहे.

माफी मागणे मनोजसाठी अडचणीचे ठरले : मनोजच्या माफीनंतर युजर्स पुन्हा एकदा अ‍ॅक्शनमध्ये आले आहेत. एका यूजरने लिहिले आहे की, आदिपुरुष 'रामायण' मालिकेची खराब कॉपी आहे यावर विश्वास ठेवण्यासाठी तुम्ही फार जास्त वेळ घेतला, जेव्हा चित्रपट फ्लॉप झाला आणि जेव्हा पुढे नेण्यासाठी काहीच उरले नाही तेव्हा ही माफी मागितली. आणखी एका युजरने लिहिले आहे की, भाऊ, जर तुम्ही प्रामाणिक मनाने माफीसाठी हात जोडलात तर देवही माफ करतो, आम्ही श्रीरामाचे भक्त आहोत, म्हणून तुम्हाला क्षमा करतो, पण पुढे सनातन धर्माशी छेडछाड करण्याचा प्रयत्नही करू नका. जयतु सनातन धर्म '. अशा अनेक प्रकारच्या कमेंट या पोस्टवर येत आहे.

आदिपुरुष बॉक्स ऑफिस कलेक्शन :आदिपुरुष या चित्रपटाला ८ जुलै रोजी रिलीजचा २२ वा दिवस सुरू झाला आहे. हा चित्रपट १६ जून रोजी प्रदर्शित झाला आणि पहिल्या दिवशी या चित्रपटाने ८८ कोटींचा व्यवसाय केला. दुसऱ्याच दिवशी चित्रपटाला देशव्यापी विरोध झाला आणि चित्रपटाची कमाई सिंगल डिजिटवर आली. हा चित्रपट अद्याप देशांतर्गत चित्रपटसृष्टीत ३०० कोटी रुपयांपर्यंत कमाई करू शकलेला नाही, तर जगभरातील चित्रपटाच्या कमाईचा आकडा ४५० रुपयांच्या जवळपास आहे.

हेही वाचा :

  1. CHANDU CHAMPION : कार्तिक आर्यनच्या स्पोर्ट्स ड्रामा 'चंदू चॅम्पियन'मध्ये श्रद्धा कपूरची एन्ट्री...
  2. Tejasswi Prakash : बहुरंगी फ्लोरल ड्रेसमध्ये तेजस्वी प्रकाशचे क्यूट पोझ फोटो
  3. SPKK Collection Day 9 : 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटाच्या कमाईचा वेग मंदावला...

ABOUT THE AUTHOR

...view details