मुंबई :आदिपुरुष, मेगा-बजेट चित्रपट असून या चित्रपटाने वीकेंडच्या पहिल्या सोमवारी संकलनात 75% घट पाहिली आहे. बॉक्स ऑफिस इंडियाच्या मते, चित्रपटाचे हिंदी कलेक्शन 8-9 कोटी रुपयांच्या श्रेणीतील होते. तसेच या चित्रपटात राघवच्या भूमिकेत प्रभास, लंकेशच्या भूमिकेत सैफ अली खान आणि जानकीच्या भूमिकेत क्रिती सॅनन आहे. आदिपुरुषला संपूर्ण देशात लक्षणीय घसरण सहन करावी लागत आहे. पहिल्या वीकेंडच्या यशस्वीतेनंतर बॉक्स ऑफिसवर टिकून राहण्याची आशा या चित्रपटाची आहे. मीडिया रिपोर्टनुसार ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरुष' या चित्रपटाची चार दिवसांची हिंदी आवृतीची एकूण कमाई अंदाजे 113 कोटी रुपये झाली आहे. कलेक्शनच्या अंदाजानुसार, हा चित्रपट आता कार्तिक आर्यनच्या 2022 च्या ब्लॉकबस्टर भूल भुलैया 2 ला मागे टाकण्यासाठी संघर्ष करू शकतो, ज्याची निर्मिती देखील भूषण कुमारच्या टी-सीरीजने केली होती. भूल भुलैया 2 या चित्रपटाने 185 कोटींपेक्षा जास्त कमाई बॉक्स ऑफिसवर केली होती.
आदिपुरुष या चित्रपवर सर्वांच्या नजरा : इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कच्या मते, सोमवारी चित्रपटाचे देशांतर्गत (नेट) कलेक्शन फक्त 20 कोटी रुपये होते. आदिपुरुषने देशांतर्गत सर्व भाषांमध्ये 93 कोटी रुपयांची कमाई केली आहे, ज्यामध्ये हिंदीचे नेटिंग अंदाजे 37 कोटी रुपये आहे. पहिल्या वीकेंडमध्ये या चित्रपटाने जागतिक बॉक्स ऑफिसवर एकूण 340 कोटींची कमाई केली आहे. आदिपुरुष या चित्रपटाने जगभरात वीकेंडला पठाणच्या रेकॉर्ड तोडला आहे (पहिल्या वीकेंडमध्ये जगभरातील रु. 313 कोटी रुपयांची कमाई केली) शाहरुख खान-स्टारर पठाण या चित्रपटाने जगभरात ₹1,050.3 कोटी रुपयांची (US$130 दशलक्ष) कमाई केली होती. आता हा आकडा आदिपुरुष चित्रपट ओलाडणार का यावर सर्वांच्या नजरा आहे.