मुंबई : प्रभास आणि क्रिती सेनॉन स्टारर वादग्रस्त पौराणिक चित्रपट आदिपुरुषच्या कलेक्शनात १० व्या दिवशी रविवारी थोडीशी वाढ झाली आहे. चित्रपटाच्या तिकीट दरात कपात केल्यानंतर अपेक्षित परिणाम सध्याला दिसून आला नाही. बॉक्स ऑफिसवर पुन्हा कमाईच्या बाबतीत गती आणण्यासाठी हा चित्रपट असमर्थ आहे. ओम राऊत दिग्दर्शित हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी आणि पहिल्या वीकेंडला जोरदार कमाई करत होता. तसेच 10व्या दिवशी, आदिपुरुषच्या कमाईत बॉक्स ऑफिसवर चढ-उतार दिसली आहे. हा चित्रपट प्रेक्षकांचा हरवलेला उत्साह पुन्हा स्थापित करू शकला नाही. 2023 च्या बहुप्रतिक्षित रिलीजपैकी हा चित्रपट एक असूनही, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पुरेशी कमाई केली नाही. निकृष्ट निर्मितीमुळे हा परिणाम दिसून येत आहे. हा चित्रपट रामायण महाकाव्यावर आधारित आहे. चित्रपटाने 9व्या दिवशी 5.63 कोटी रुपयांची कमाई केली आणि रविवारी हा आकडा थोड्या फरकाने वाढला आहे.
10 व्या दिवसाची कमाई : आदिपुरुष चित्रपटाने 10 व्या दिवशी 6 कोटींचा व्यवसाय केला आहे. यासह, चित्रपटाचे एकूण कलेक्शन 274.55 कोटी देशांतर्गत केले आहे आणि जगभरातील चित्रपटाने आधीच 400 कोटींचा टप्पा ओलांडला होता. रविवारी (25 जून) म्हणजेच रिलीजच्या दहाव्या दिवशी थिएटरमध्ये 16.34 ऑक्युपन्सीद्वारे रेकॉर्ड झाले. तसेच चित्रपट दुसऱ्या आठवड्यात दाखल होताच निर्मात्यांनी चित्रपटाच्या तिकिटाच्या किंमतीत आणखी कपात केला आहे.