मुंबई- ओम राऊत यांनी दिग्दर्शित केलेल्या आदिपुरुष या रामायणावर आधारित चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर 140 कोटी रुपये कमावले आहेत, असे ५०० कोटी रुपयांच्या भव्य बजेटमध्ये चित्रपट बवणाऱ्या निर्मात्यांनी जाहीर केले आहे. प्रभासची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने अखिल भारतीय स्तरावर हिंदीमध्ये बनवलेल्या कोणत्याही चित्रपटाहून अधिक कमाई आदिपुरुषने केली आहे.
'सिनेमॅटिक एक्स्ट्राव्हॅगान्झा असलेल्या आदिपुरुषने बॉक्स ऑफिसवर मोठा प्रभाव निर्माण केला आहे. ग्लोबल बॉक्स ऑफिसवर 140 कोटी रुपयांच्या आश्चर्यकारक ओपनिंगसह या उत्कृष्ट चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकले आहेत,' असे निवेदनात म्हटले आहे. बहुभाषिक आदिपुरुष 3D व 2Dमध्ये शुक्रवारी मोठ्या धूमधडाक्यात प्रदर्शित झाला, यात राघवच्या भूमिकेत प्रभास, जानकीच्या भूमिकेत क्रिती सेनॉन आणि लंकेशच्या भूमिकेत सैफ अली खान आहेत. टी-सीरीजचे भूषण कुमार यांनी याची निर्मिती केली आहे.
निर्मात्यांच्या मते, आदिपुरुष हृतिक रोशनच्या वॉर, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट अभिनीत ब्रह्मास्त्र आणि शाहरुख खान-स्टारर पठाण या चित्रपटाच्या श्रेणीत सामील होतो. इतर भाषांमध्ये प्रदर्शित झालेल्या कोणत्याही हिंदी चित्रपटासाठी संपूर्ण भारतातील सर्वोच्च सलामीची कमाई देणारा हा एकमेव चित्रपट असल्याचा दावा निर्मात्यांनी केलाय. याचा अर्थ, या चित्रपटाने पठाणच्या हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिल्या दिवशीच्या सर्वोच्च कमाईला मागे टाकले आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीत आतापर्यंत सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांकडे एक नजर टाका:
आदिपुरुष: रु १४० कोटी
पठाण: रु. १०६ कोटी
ब्रह्मास्त्र: ७५ कोटी रुपये