महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Adipurush Box Office Collection Day 8 : आठव्या दिवशी ‘आदिपुरुष’या चित्रपटाच्या कमाईत झाली फार मोठी घसरण - चित्रटपटाच्या कलेक्शनमध्ये घट पाहायला मिळत आहे

‘आदिपुरुष’ या चित्रपटाने एका आठवड्यात बॉक्स ऑफिसवर चित्रपटाच्या बजेटपेक्षा कमी कमाई केली आहे. या चित्रटपटाच्या कलेक्शनमध्ये सोमवारपासून घट पाहायला मिळत आहे. आज आणि उद्या रविवारी हा चित्रपट किती कमाई करेल हे बघने आता लक्षणीय ठरणार आहे.

Adipurush Box Office Collection Day 8
आदिपुरुष बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 8

By

Published : Jun 24, 2023, 12:37 PM IST

मुंबई : १६ जून रोजी प्रदर्शित झालेला ‘आदिपुरुष’ चित्रपटाने एका आठवड्यात बॉक्स ऑफिसवर चित्रपटाच्या बजेटपेक्षा कमी कमाई केली आहे. आदिपुरुष रूपेरी पडद्यावर प्रदर्शित झाल्यानंतर सुरुवातीला तीन दिवस चांगलीच कमाई केली. त्यानंतर या चित्रटपटाच्या कलेक्शनमध्ये सोमवारपासून घट पाहायला मिळत आहे. आठव्या दिवशी म्हणजेच शुक्रवारीही सुद्धा चित्रपटाच्या कमाईत घट झाली आहे. शुक्रवारी तर चित्रपटाने सर्वात कमी कमाई केली आहे.

आदिपुरुष या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन :सॅकनिल्कच्या मते, आदिपुरुषने सर्व भाषांसह भारतात ३.२५ कोटी रुपयांची कमाई केली. आठ दिवसांच्या शेवटी, आदिपुरुषचे एकूण देशांतर्गत कलेक्शन जवळपास रु. २६३.१५ कोटी आहे. ऑक्युपन्सी रेटमध्ये मोठी घट झाली आहे जी शुक्रवारी हिंदीमध्ये ११.२० टक्के होती. चित्रपटगृहांमध्ये कमी व्यापामुळे अनेक शो रद्द करण्यात आल्याचेही अहवालात म्हटले आहे.

तिकिटे केली स्वस्त : चित्रपटाच्या कमी कमाईमुळे निर्मात्यांनी २२ जून आणि २३ जून या दोन दिवसांसाठी थ्रीडी तिकिटांची किंमत कमी केली होती. मात्र यांचा देखील सकारत्मक परिणाम दिसला नाही. ‘आदिपुरुष’ची 3D तिकिटे फक्त १५० रुपयांमध्ये मिळतील, अशी घोषणा करण्यात आली. मात्र दोन्ही दिवसांत कमाईत खूप मोठा घट झाला. 16 जून रोजी देशभरात हिंदी, तेलगू, कन्नड, मल्याळम आणि तमिळमध्ये प्रदर्शित झालेल्या आदिपुरुषने अवघ्या तीन दिवसांत ३४० कोटी रुपयांची गल्ला जमवला. दरम्यान आदिपुरुषने देशांतर्गत आतापर्यंत. २६३.१५ कोटी रुपये कमावले आहेत. त्यामुळे हा चित्रपट बजेट इतके पैसे कमविल का यावर एक प्रश्न चिन्ह उपस्थित झाले आहे.

वादग्रस्त संवादामुळे कमाईत घसरण : दरम्यान, पहिल्याच दिवशी चित्रपट नकारात्मक रिव्ह्यू आणि वादग्रस्त संवादामुळे हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला. यानंतर चित्रपटाचा संवादही बदलण्यात आला होता, मात्र काही प्रेक्षकांनी या चित्रपटाला नाकारले आहे. संवाद बदलण्याचा फायदा निर्मात्यांना झाला नाही. याशिवाय या चित्रपटावर बंदी घालावी असेही प्रेक्षकांनी म्हटले होते. या चित्रपटावर नेपाळमध्ये बंदी लावण्यात आली होती, मात्र आता ती बंदी उठविण्यात आली आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी जगभरात १४० कोटींचा व्यवसाय केला होता. आता या चित्रपटाच्या कमाईत फार घसरण होताना दिसत आहे. आज आणि उद्या रविवारी हा चित्रपट किती कमाई करेल हे बघने लक्षणीय ठरणार आहे. वीकेंडमुळे आज प्रेक्षक हा चित्रपट बघायला चित्रपटगृहात जातील का यावर सर्वाच्या नजरा आहेत.

हेही वाचा :

  1. Ranbir and Alia date night: रणबीर कपूर आणि आलिया भट्टची दुबईमध्ये डेट नाईट
  2. Dhoomam: Box office day 1: फहाद फासिलचा नवीनतम अ‍ॅक्शन थ्रिलर 'धूमम' चित्रपट आज मोठ्या पडद्यावर प्रदर्शित
  3. Tiku Weds Sheru Twitter review: नेटिझन्सनी दिला चित्रपटाच्या बाजून कौल, नवाझ आणि अवनीत कौरची होतेय प्रशंसा

ABOUT THE AUTHOR

...view details