महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Adipurush box office collection Day 11 : आदिपुरुष या चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवरून उडाला रंग

प्रभास, क्रिती सेनॉन आणि सैफ अली खान स्टारर आदिपुरुषचे बॉक्स ऑफिसवर रिकव्हरीची चिन्हे दिसत नाही आहे. चित्रपटाला सतत विरोध झाल्यामुळे हा परिणाम दिसत आहे. ११व्या दिवसाचे आदिपुरुष बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घेण्यासाठी वाचा.

Adipurush box office collection Day 11
आदिपुरुष बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 11

By

Published : Jun 27, 2023, 2:13 PM IST

मुंबई : प्रभास, क्रिती सेनॉन आणि सैफ अली खान स्टारर आदिपुरुष या चित्रपटाचे बॉक्स ऑफिसवर रिकव्हर होण्याची चिन्हे दिसत नाहीत. वाईट निर्मितीमुळे आणि नकारात्मक रिव्ह्यूमुळे असा परिणाम होताना दिसत आहे. आदिपुरुष हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर घसरणीचा ट्रेंड पाहत आहे. सोमवारी, ओम राऊत दिग्दर्शित चित्रपटाने देशांतर्गत बाजारात आतापर्यंतची सर्वात कमी कलेक्शन केले.

वादग्रस्त चित्रपट आदिपुरुष :या चित्रपटाच्या टीझरला मात्र फार उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. महाकाव्य रामायणचे रुपांतर असलेल्या चित्रपट क्लिष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स, त्या काळातील चुकीचे चित्रण आणि कुरूप संवादामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. त्यामुळे प्रेक्षकांची निराशा झाली. यामुळे प्रेक्षकांनी चित्रपट निर्मात्यांना शिव्या देखील दिल्या होत्या. या वादग्रस्त चित्रपटाला आज २७ जून रोजी १२ वा दिवस सुरू झाला आहे. चित्रपटाचे ११ दिवसांचे कलेक्शन जगासमोर आहे, जे खूपच धक्कादायक आहे. ६०० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाला चौफेर विरोध होत आहे. व्हीएफएक्स आणि कुरूप संवादांमुळे चित्रपट बॉक्स ऑफिसवर उद्ध्वस्त झाला आहे. चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहाबाहेर गर्दी होत आहे, कारण काही प्रेक्षकांना जाणून घ्यायचे आहे की या चित्रपटाला इतका विरोध केला जात आहे.

बॉक्स ऑफिस कलेक्शन : इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कनुसार, आदिपुरुष बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस ११ साठी प्रारंभिक अंदाज १.७५ कोटी रुपये आहे, ज्यात देशांतर्गत बाजारातील सर्व भाषांचा समावेश आहे. ११ दिवसांच्या शेवटी, आदिपुरुषने भारतात २७७.५० कोटी रुपयांची कमाई केली. ११व्या दिवशी आदिपुरुषचा हिंदी मार्केटमध्ये एकूण ८.०६% व्याप होता. अहवालांनुसार, जवळपास कोणतीही मोठी रिलीज नसतानाही खराब ऑक्युपन्सी दरांमुळे चित्रपट उद्धवस्त होत आहे. प्रेक्षकांना सिनेमा हॉलमध्ये आकर्षित करण्याचा निष्फळ प्रयत्न म्हणून, निर्मात्यांनी चित्रपटाच्या तिकीटाची किंमती देखील 112 रुपयांपर्यंत कमी केली होती. टी-सीरीजद्वारे बँकरोल केलेला, आदिपुरुष 16 जून रोजी हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषेत रूपेरी पडद्यावर प्रदर्शित झाला होता. मात्र या चित्रपटाला प्रचंड विरोध झाल्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमी कमाई करत आहे.

हेही वाचा :

  1. Allu Sirish : अल्लू सिरिशने बॉलिवूड अभिनेता आमिर खानसोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर केला शेअर
  2. Kanimozhi ticket controversy : कमल हसन यांनी कोईम्बतूरच्या पहिल्या महिला बस चालकाला भेट दिली कार
  3. Chhotya Bayochi Mothi Swapna : ‘का रे दुरावा’ फेम सुरुची अडारकर दिसणार ‘छोट्या बयोची मोठी स्वप्नं'मध्ये!

ABOUT THE AUTHOR

...view details