महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Adipurush box office collection Day 20 : 'आदिपुरुष' चित्रपट २० दिवसात आला व्हेंटिलेटरवर... - क्रिती सेनॉन

प्रभास आणि क्रिती सेनॉन यांचा चित्रपट 'आदिपुरुष' हा २० दिवसात व्हेंटिलेटरवर आला आहे. २०व्या दिवशी या चित्रपटाने फारच कमी कमाई केली नाही. त्यामुळे आता हा चित्रपट लवकरच पडद्यावर उतरू शकतो.

Adipurush box office collection Day 20
आदिपुरुष बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस २०

By

Published : Jul 6, 2023, 1:15 PM IST

मुंबई : 'साहो' आणि 'राधे श्याम'नंतर 'बाहुबली' स्टार प्रभासच्या करिअरमध्ये आणखी एक फ्लॉप चित्रपटाने भर टाकली आहे. हा चित्रपट आदिपुरुष आहे हे सर्वांना माहित आहे. मात्र या चित्रपटाने प्रभासच्या करिअरमध्ये एक मोठा डाग सोडला आहे. हा चित्रपट इतक्या वाईट प्रकारे फ्लॉप झाला आहे की, या चित्रपटाबद्दल बोलयला गेले तरी प्रेक्षक या चित्रपबद्दल वाईट बोलतील. अशा पद्धतीने या चित्रपटाचे नाव खराब झाले आहे. रिलीजच्या पूर्वी या चित्रपटापासून प्रेक्षकांना फार अपेक्षा होत्या मात्र सर्व अपेक्षा या मातीत गेल्या आहे. प्रेक्षकांनी या चित्रपटाला नाकारले आहे.

आदिपुरुष चित्रपट व्हेंटिलेटरवर : देशातील निषेधाचा बळी ठरलेला आदिपुरुष हा चित्रपट १६ जून रोजी प्रदर्शित झाला. ६ जुलै रोजी या चित्रपटाला २१वा दिवस सुरू आहे. पहिल्याच दिवशी हा चित्रपट लोकांच्या मनातून उतरला होता आणि आता फक्त पडद्यावर उतरणे बाकी आहे. चित्रपटाच्या २०व्या दिवसाच्या कमाईवरून असे दिसून येते की आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर व्हेंटिलेटरवर आला आहे. ६०० कोटींच्या प्रचंड बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट आपला खर्च वसूल करण्यात अपयशी ठरला आहे. हा चित्रपट कोणाला बघायचा नाही आहे. फक्त तेच प्रेक्षक आदिपुरुष चित्रपट पाहत आहेत, ज्यांना जाणून घ्यायचे आहे की, चित्रपट दिग्दर्शक ओम राऊत आणि संवाद लेखक मनोज मुंतशीर यांनी या चित्रपटात काय चुका केल्या आहेत.

२०व्या दिवसाची कमाई :आदिपुरुषच्या २०व्या दिवशी म्हणजेच बुधवारबद्दल बोलायचे झाले तर, या चित्रपटाने अंदाजे २० लाख रुपयांची कमाई केली असल्याचे सांगितले जात आहे. बिग बजेट चित्रपटाच्या निर्मात्यांसाठी ही खरोखरच एक लाजिरवाणी गोष्ट आहे. चित्रपटाचे २०व्या दिवसाच्या कलेक्शनवरून असे ओळखयला येत आहे, की आता हा चित्रपट लवकरच पडद्यावरून उतरणार आहे. या चित्रपटामुळे प्रेक्षकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहे. याहूनही लाजिरवाणी गोष्ट म्हणजे या २० दिवसांत हा चित्रपट देशातच ३०० कोटींचा आकडा गाठू शकलेला नाही. या चित्रपटाने आतापर्यंत जवळपास २८५ कोटींचा व्यवसाय केला आहे. त्याचबरोबर जगभरातील चित्रपटाची कमाई ४६० कोटींच्या खाली आहे.

आदिपुरुषाबद्दल : तान्हाजी फेम दिग्दर्शक ओम राऊत यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून मनोज मुनताशीर यांनी या चित्रपटाचे संवाद लिहिले आहेत ज्यांना स्वस्त आणि टोपोरी म्हटले गेले आहे. या चित्रपटात प्रभास राघवच्या भूमिकेत, क्रिती सेनॉन जानकीच्या भूमिकेत, सनी सिंह लक्ष्मणच्या भूमिकेत, देवदत्त नागे हनुमानजीच्या भूमिकेत आणि सैफ अली खान हा लंकेशच्या भूमिकेत आहे.

हेही वाचा :

  1. Sameer Wankhede Issue : लाच घेणारा तसेच लाच देणारा देखील आरोपी; समीर वानखेडेंच्या वकिलांचा न्यायालयात सवाल
  2. SPKK box office collection day 7 : 'सत्यप्रेम की कथा'ने 50 कोटींचा आकडा पार केला, एका क्लिकवर चित्रपटाचे एकूण कलेक्शन पहा
  3. Kusha Kapila : घटस्फोटानंतर कुशा कपिलाने शेअर केली 'बेस्ट फ्रेंड' दीपिका पदुकोणसोबत पहिली पोस्ट

ABOUT THE AUTHOR

...view details