मुंबई - Adah Sharma : अभिनेत्री अदा शर्माबद्दल बऱ्याच दिवसांपासून अशी अफवा होती की ती दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतचं घर खरेदी करणार आहे. अलीकडेच एका मीडिया संवादात, अदा शर्मानं या अफवांवर तिची प्रतिक्रिया दिली आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अदानं सांगितलं की, 'तिनं अद्याप या विषयावर कोणताही निर्णय घेतलेला नाही. 'काहीही झाले तरी मी तुम्हाला आधी सांगेन, मी वचन देते की, जर असं काही घडलं, तर मी तुम्हाला याबद्दल नक्कीच माहिती देईन.' अदा शर्मा पुढं म्हटलं की, 'माझे घर हेच माझे मंदिर आहे. मी ज्या ठिकाणी राहत आहे, अशा गोष्टी प्रत्येक वर्तमानपत्रात आणि फोनवर पसरवल्या जाव्यात असे मला वाटत नाही. जर मी माझे घर बदलण्याचा निर्णय घेतला तर, मी माझ्या पद्धतीनं आणि याबद्दल माझ्या चाहत्यांना माहिती देईन. आता लोकांना त्यांचे स्वतःचे अंदाज लावू द्या.
अदा शर्माला मीडिया बोलताना सांगितलं : जेव्हा अदा शर्माला मीडिया संभाषणात विचारण्यात आले की, अशा अफवांमुळे तुम्हाला त्रास होते की नाही का? यावर तिनं म्हटलं, 'मी माझ्या चाहत्यांना पाहिजे तेव्हा सांगू शकते. मला कोणत्याही अफवा अस्वस्थ करत नाही. मी एक अभिनेत्री आहे, त्यामुळं अशा अफवा माझ्या आयुष्याचा भाग आहेत. माझ्या चाहत्यांना माझ्याबद्दल जाणून घेण्याचा अधिकार आहे'. अदा शर्मा पुढं सांगितल की, मला माझे आयुष्य खूप खाजगी ठेवायला आवडते. तिनं पुढं म्हटलं, 'जेव्हा मी 'द केरळ स्टोरी'चे शूटिंग करत होते, तेव्हा कोणाला माहितही नव्हते. मी शूटिंग करत असताना मला कोणी फोन केला तरी मी त्यांना माझ्या प्रोजेक्टबद्दल काहीच सांगत नव्हते. मी स्पष्ट उत्तर देत नाही. जेव्हा प्रोजेक्ट्स रिलीज होणार असतात, तेव्हाच मी त्यांच्याबद्दल कोणाशीही बोलते'.