मुंबई - Tamannaah Bhatia Vijay Varma : साऊथ अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि अभिनेता विजय वर्मा हे त्यांच्या नात्यामुळे कायमच चर्चेत असतात. हे जोडपे अनेकदा एकत्र बाहेर फिरताना दिसतात. दरम्यान आता या कपलला आणखी एका कार्यक्रमात एकत्र पाहिल्या गेलं आहे. त्यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये त्यांच्या दोघांमधील केमिस्ट्री ही जबरदस्त दिसत आहे. तमन्ना भाटिया बॉयफ्रेंड विजय वर्मासोबत एका कार्यक्रमात पोहोचली. या कार्यक्रमामध्ये ती आपल्या बॉयफ्रेंडवर प्रेमाचा वर्षाव करताना आणि त्याची काळजी घेताना दिसली.
तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा झाले एकत्र स्पॉट : या व्हायरल झालेल्या या व्हिडिओवर अनेकजण कमेंट करून या कपलचे कौतुक करत आहेत. व्हिडिओमध्ये तमन्ना आणि विजय एकत्र दिसत आहेत. दरम्यान विजयनं परिधान केलेला बॅच हा खाली पडला त्यानंतर तमन्ना खाली वाकते आणि तो बॅच उचलते. त्यानंतर ती तो बॅच विजयच्या ड्रेसवर लावते. या दोघांचा हा सुंदर बॉन्ड चाहत्यांना खूप आवडला आहे. व्हिडिओमध्ये तमन्नाची ही बॉयफ्रेंडविषयी काळजी पाहून चाहत्यांनी तिचे कौतुक केले आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर एका सोशल मीडिया यूजरनं लिहलं की, 'हे कपल एकत्र खूप सुंदर दिसत आहे'. दुसऱ्या एकानं लिहलं, 'खूप सुंदर'. आणखी एकानं लिहल, 'या जोडप्यांनी लवकर लग्न केले पाहिजे'. अशा अनेक कमेंट या व्हिडिओवर येत आहेत. याशिवाय काहीजण या व्हिडिओवर हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करत आहेत.