मुंबई - राजकुमार राव ( Rajkummar Rao ) आणि सान्या मल्होत्रा ( Sanya Malhotra ) यांच्या प्रमुख भूमिका असलेला HIT - द फर्स्ट केस ( HIT - The First Case ) हा चित्रपट अलिकडेच रिलीज झाला आहे. हा चित्रपट मूळ तेलुगु भाषेतील याच नावाच्या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटाचे कथानक तेलंगणा राज्याच्या होमिसाईड इंटरव्हेन्शन टीम (एचआयटी) चे पोलीस अधिकारी विक्रम जयसिंग (राजकुमार यांनी साकारले आहे), याला एका तरुण मुलगीच्या हरवलेल्या प्रकरणाची चौकशी करण्याचे काम दिले जाते यावर आधारित आहे. या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान सान्या मल्होत्राने मुंबईच्या तुलनेत दिल्ली अधिक असुरक्षित का वाटते याचा खुलासा केला आहे.
दिल्लीमध्ये महिला सुरक्षित नाहीत अशी चर्चा बऱ्याचदा होत असते. सान्या ही दिल्लीची रहिवासी आहे. तिला दिल्ली किती सुरक्षित वाटते असा प्रश्न मुलाखतीत विचारण्यात आला होता.
दिल्लीच्या तुलनेत मुंबई सुरक्षित - सान्या मल्होत्रा ही दिल्लीची असली तरी तिला राष्ट्रीय राजधानी मुंबईच्या तुलनेत खूपच असुरक्षित वाटते. अभिनेत्री म्हणाली, "मी दिल्लीची आहे आणि मी दिल्लीपेक्षा मुंबईला प्राधान्य देण्याचे एक चांगले कारण आहे. मला मुंबईत अधिक सुरक्षित वाटते. दिल्लीत सुधारणा झाली आहे की नाही हे मला माहीत नाही, पण मला तिथे सुरक्षित वाटत नाही. त्याचे कारणही सांगू शकत नाही. मला वाटत नाही की दिल्लीत अशी एकही महिला नसेल जिने छेडछाडीचा सामना केला नाही."