महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Rashmika deepfake video: रश्मिका डीपफेक व्हिडिओ प्रकरणी एफआयआर दाखल, तपासासाठी पोलिसांची विशेष पथके सज्ज

Rashmika deepfake video: रश्मिका मंदान्ना डीपफेक व्हायरल व्हिडिओप्रकरणी शुक्रवारी अज्ञात व्यक्तींविरुद्ध दिल्लीतील पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. दिल्ली महिला आयोगाने मॉर्फ व्हिडिओची गंभीर दखल घेऊन शहर पोलिसांकेड चौकशीची मागणी केली होती. त्यानुसार पोलिसांकडून या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत.

Rashmika deepfake video
रश्मिका मंदान्ना

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 11, 2023, 10:01 AM IST

Updated : Nov 11, 2023, 11:54 AM IST

नवी दिल्ली - Rashmika deepfake video: अभिनेत्री रश्मिका मंदान्नाचा अलिकडेच एक मॉर्फ केलेला व्हिडिओ व्हायरल झाला होता. मूळ झारा पटेल हिच्या व्हिडिओवर रश्मिकाचा चेहरा लावण्यात आला होता. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी अज्ञात व्यक्तींविरुद्ध एफआयआर नोंदवला आणि अभिनेत्री रश्मिका मंदान्नाच्या डीपफेक एआय-जनरेटेड व्हायरल व्हिडिओची चौकशी सुरू केली. आयपीसीच्या कलम 465 आणि 469 तसेच आयटी कायद्याच्या कलम 66C आणि 66E अंतर्गत दिल्लीच्या स्पेशल सेल पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

दिल्ली महिला आयोगाने (DCW) महिलांची बदनामी करणारे हे मॉर्फ व्हिडिओ प्रकरण गांभीर्यानं घेतलं आणि याला जबाबदार व्यक्तींविरुद्ध कारवाईची दिल्ली शहर पोलिसांकडे केली होती. महिला आयोगाच्या या नोटीशीची दखल घेत काही तासांत एफआयआरची नोंदणी झाली आहे.

एका निवेदनात दिल्ली महिला आयोगाने चिंता व्यक्त केली आहे की, कोणीतरी अभिनेत्रीचे चित्र बेकायदेशीरपणे मॉर्फ केले आहे आणि सोशल मीडियावर प्रसारित केले आहे. ही एक गंभीर बाब आहे. असे कृत्य करणाऱ्या व्यक्तींवर कायद्यानुसार योग्य कारवाई झाली पाहिजे. परंतु, डीपफेक व्हिडिओ प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. आयोगाने दिल्ली पोलिसांना एफआयआरची प्रत आणि कारवाईचा अहवाल 17 नोव्हेंबरपर्यंत देण्यास सांगितले आहे. डीपफेक व्हिडिओ आणि सोशल मीडियावर प्रसारित होण्यामागील व्यक्तींचा तपशीलही मागवला आहे. यानंतर दिल्ली पोलीस सतर्क झाले आहेत. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलचे इंटेलिजन्स फ्यूजन आणि स्ट्रॅटेजिक ऑपरेशन्स युनिट या प्रकरणाचा तपास करत असून या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत.

रश्मिका मंदान्नाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर याची दखल 'मेगास्टार' अमिताभ बच्चन यांनी घेतली होती. अशा प्रकारे डीपफेक व्हिडिओ बनवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. या घटनेनंतर अनेकांनी रश्मिकाला पाठींबा दर्शवून कारवाईची मागणी केली. हा मूळ व्हिडिओ ज्या झारा पटेलचा आहे तिनंही हा व्हिडिओ कोणी बनवलाय याची कल्पना नसल्याचं म्हटलंय. दिल्ली पोलीस या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन तपास करत आहेत.

हेही वाचा -

  1. Koffee With Karan 8: सलमान खानमुळे सीझनचा अखेर होणार संस्मरणीय, जोडीदाराचा शोध जारी

2.Tunisha Sharma Suicide Case : तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणी शिझान खानचा अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला

3.Tiger Vs Pathaan : 'टायगर व्हर्सेस पठाण'साठी सलमान खान सज्ज, दोन गुप्तहेरात होणार संघर्ष

Last Updated : Nov 11, 2023, 11:54 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details