महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Parineeti Chopra Purse : परिणीती चोप्राच्या या पर्सची किंमत किती? जाणून व्हाल थक्क! - Parineeti Chopra Purse price

'आप' नेते राघव चढ्ढांसोबत एंगेजमेंट झाल्यानंतर अभिनेत्री परिणीती चोप्रा आता तिच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त आहे. नुकतीच ती मुंबई विमानतळावर दिसली. तिने तिच्या सोबत एक पर्स कॅरी केली होती. या पर्सची किंमत ऐकून तुम्ही थक्क व्हाल..

Parineeti Chopra Purse
परिणीती चोप्रा पर्स

By

Published : Jul 16, 2023, 5:42 PM IST

मुंबई : आम आदमी पक्षाचे खासदार राघव चढ्ढा यांची होणारी पत्नी आणि प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. नुकतेच तिला मुंबई विमानतळावर स्पॉट करण्यात आले. या दरम्यान पापाराझीने तिला एका आलिशान पर्ससह आपल्या कॅमेऱ्यात कैद केले. त्या पर्सची किंमत तब्बल 2 लाखांहून अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे.

पर्सची किंमत सुमारे 2 लाख 19 हजार रुपये : एका पापाराझीने त्याच्या अधिकृत इंस्टाग्रामवर परिणीतीचा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये परिणीती ब्लॅक लूकमध्ये दिसत आहे. तिने काळ्या रंगाचा जंप सूट परिधान केला आहे. तसेच तिने तिच्या आउटफिटला मॅचिंग सनग्लासेस आणि पादत्राणे परिधान केली आहेत. मात्र या सगळ्यामध्ये परिणीतीच्या पर्सने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिच्या जवळ असलेल्या या काळ्या रंगाच्या पर्सची किंमत सुमारे 2 लाख 19 हजार रुपये आहे. परिणीती या तिच्या ऑल ब्लॅक लूकमध्ये खूपच आकर्षक दिसत आहे.

परिणीती चोप्राची वर्कफ्रंट : परिणीती चोप्रा लवकरच अभिनेता दिलजीत दोसांझसोबत 'चमकिला' चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट डायरेक्ट ओटीटीवर रिलीज होणार आहे. या चित्रपटात दिलजीत हा पंजाबचा कलाकार अमरसिंग चमकिला याची भूमिका साकारणार आहे. तर परिणीती त्याची पत्नी अमरजोत कौरची भूमिका साकारताना दिसणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक इम्तियाज अली हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.

13 मे रोजी साखरपुडा झाला :परिणीती आणि राघव चढ्ढा या जोडप्याने 13 मे रोजी नवी दिल्लीत त्यांचे जवळचे नातेवाईक व प्रियजनांच्या उपस्थितीत साखरपुडा केला. राघव आणि परिणीतीने बराच काळ त्यांच्या नात्याबद्दल मौन बाळगले होते. त्यांच्या दिल्लीतील साखरपुड्याला परिणीतीची बहिण प्रियांका चोप्रा, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तसेच पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासह अनेक हाय प्रोफाईल सेलेब्रिटींनी हजेरी लावली होती.

हे ही वाचा :

  1. Ananya security pushes fan : अनन्या पांडेच्या बॉडी गार्ड्सने फॅनला ढकले, वाचा नंतर काय घडले
  2. The battle story of somnath : 'द बॅटल स्टोरी ऑफ सोमनाथ' चित्रपटाची घोषणा, टीझरही झाला प्रदर्शित
  3. Main Atal Hoon : 'मैं अटल हूं' या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण; पंकज त्रिपाठीने शेअर केला अनुभव...

ABOUT THE AUTHOR

...view details