मुंबई :आरआरआर या सुप्रसिद्ध चित्रपटामुळे चित्रपट निर्माते एस एस राजमौली हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांच्या आरआरआर या चित्रपटातील नाटू नाटू या गाण्याला अमेरिकेतील डायरेक्टर गिल्ड ऑफ यूएस हा पुरस्कारही मिळाला आहे. मात्र आता राजामौली नव्या वादात अडकले आहेत. न्यूयार्क येथे गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी धर्मावर भाष्य केल्याने त्यांच्यावर टीक करण्यात येत आहे. मात्र या टीकाकारांना उत्तर देण्यासाठी बॉलिवूड क्विन कंगना राणावत मैदानात उतरली आहे. राजामौली विरोधात आपण काहीच सहन करु शकमार नसल्याचे तिने टीकाकारांना सुनावले आहे.
काय आहे राजामौली विवाद प्रकरण :एस एस राजामौली हे न्यूयार्क येथील गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात सहभागी झाले होते. यावेळी न्यूयार्क येथील एका मुलाखतीत एस एस राजामौली यांनी धर्मावर भाष्य केले होते. मी अगोदर खूप धार्मीक होतो. आता मात्र तितका नाही. मात्र मी नास्तीकही झालो नसल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. रामायण आणि महाभारतावरही त्यांनी यावेळी भाष्य केले. त्यासह आरआरआर हा चित्रपट दक्षिण भारतातील आहे. त्याच दक्षिण भारतातून मी येतो असेही त्यांनी यावेळी सांगतिले. त्यामुळे हा बॉलिवूडचा चित्रपट नाही, तर दक्षिण भारतीय चित्रपट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे बॉलिवूड विरुद्ध दक्षिणात्य चित्रपट असा वाद सुरू झाला. त्यामुळे एस एस राजामौली यांना चांगलेच ट्रोल करण्यात येत आहे. सोशल माध्यमात त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. त्यामुळे चांगलाच वाद ओढवला आहे.